शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

तिन्ही शिशू चिरनिद्रिस्त

By admin | Updated: May 31, 2017 00:21 IST

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पीडीएमसीत उपचार घेताना दगावलेल्या तिन्ही मृत शिशुंवर ३६ तासांच्या प्रदीर्घ गोंधळानंतर मंगळवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार : अखेर ३६ तासांनी थांबली फरफटलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पीडीएमसीत उपचार घेताना दगावलेल्या तिन्ही मृत शिशुंवर ३६ तासांच्या प्रदीर्घ गोंधळानंतर मंगळवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकांच्या भावना अनावर झाल्या होत्या. रविवारी मध्यरात्री शिशुंचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर पालकांचा रोष उफाळून आला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. तणावजन्य स्थिती पाहता सोमवारी पहाटेच तिन्ही शिशुंचे शव इर्विनच्या शवविच्छेदनगृहात नेण्यात आले. मात्र, अकोल्यातील डॉक्टरांची चमू उशिरा रात्री पर्यंत न पोहोचल्याने पालकांसह नातलग ताटकळले होते. अखेरीस रात्री ८.३० वाजता डॉक्टरांची चमू पोहोचली आणि शवविच्छेदन सुरू झाले. ही प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. त्यामुळे पालकांना त्यांच्या चिमुकल्यांचे शव हस्तांतरीत होऊ शकले नाहीत. अखेरीस मंगळवारी सकाळी मृत शिशुंचे नातलग मृतदेह घेण्यास इर्विनच्या पोस्टमार्टम हाऊससमोर गोळा झाले. आमदार राणादेखील तेथे पोहोचले. त्यांनी गोरगरीब पालकांच्या वेदना पाहून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचून त्यांच्याशी चर्चा केली. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवण्याचे आश्वासन विभागीय आयुक्तांनी दिलेत. यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास आशिष घरडे, दिनेश विरूळकर, बंटी कावरे यांनी मुलांचे पार्थिव सोपविण्यात आले. पार्थिव घेऊन तिघेही आपापल्या घरी पोहोचलेत. तेथेही चिमुकल्यांच्या मातांचा हृदय हेलावणारा आकांत सुरू होता. पुरते जगही न पाहिलेल्या आपल्या बाळांना शेवटचे पाहून त्यांना हृदयाशी कवटाळून त्यांना मातांसह नातलगांनी अंतिम निरोप दिला. बंटी कावरे यांच्या शिशूवर शंकरनगरातील स्मशानभूमित तर आशिष घरडे यांच्या बाळाचा सीआरपीएफ कॅम्प परिसरातील आणि दिनेश विरूळकर यांच्या बाळाचा फ्रेजरपुऱ्याच्या स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला. मातेची प्रकृती बिघडलीपोटच्या गोळ्याचे कलेवर पाहून शिल्पा विरूळकर नामक मातेची प्रकृती अचानक बिघडली. शवविच्छेदनानंतर बाळाला घरी आणताच त्या भोवळ येऊन बेशुद्ध झाल्या. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता त्यांना खासगी इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.