शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोलीच्या युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या

By admin | Updated: September 28, 2016 00:09 IST

अंजनगाव मार्गावर सोमवारी मध्यरात्रीदरम्यान इटकी ते लेहेगाव दरम्यानच्या एका शेतशिवारात युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली.

इटकी फाट्यावरील घटना : सोमवारी मध्यरात्री घडला थरार, आरोपी फरारलेहगाव / दर्यापूर : अंजनगाव मार्गावर सोमवारी मध्यरात्रीदरम्यान इटकी ते लेहेगाव दरम्यानच्या एका शेतशिवारात युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी सकाळी शेतीच्या कामाला जाणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या दृष्टीस पडल्यानंतर त्यांनी गावच्या पोलीस पाटलांना ही माहिती दिली. पश्चात पोलिसांना पाचारण करण्यात आले. अमर सुखदेवराव साबळे (३२,रा.चिंचोली रहिमापूर) असे मृताचे नाव आहे. सोमवारी रात्री ११ वाजतादरम्यान मृत अमर साबळे हा लहान भाऊ सचिनची दुचाकी घेऊन दर्यापूरहून चिंचोलीकडे निघाला. रात्री १२ वाजताच्या सुमारास दर्यापूर तालुक्यातील अंजनगाव मार्गावरील लेहगाव इटकी परिसरात अज्ञात आरोपींनी अमर याचा गळा व नाक कापून आणि डोक्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या केली आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला खोदलेल्या नालीत फेकून दिला. घटनास्थळानजीकच्या नालीत मृत अमर याची एम.एच.३०-यू.-२३८ क्रमांकाची दुचाकीदेखील मोडतोड झालेल्या स्थितीत आढळून आली. मृत अमर साबळे हा ‘मैत्रेय’ कंपनीचा एजंट म्हणून कार्यरत होता. त्याच्या मागे आई-वडील, दोन भाऊ व बहीण, पत्नी असा परिवार आहे. या घटनेची माहिती इटकीचे उपसरपंच गोपाल अरबट यांनी तातडीने पोलिसांना दिली. पश्चात लगेच दर्यापूर येथून पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. शवविच्छेदनानंतर अमर साबळेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. (शहर प्रतिनिधी)घटनास्थळी बघ्यांची गर्दीघटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळल्याने हा मार्ग अवरूद्ध झाला होता. पोलिसांनी गर्दी पांगविली. येवद्याचे ठाणेदार नरेश पिंपळकर, दर्यापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, दर्यापूरचे ठाणेदार नितीन गवारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनेश टेकाडे, जमादार कमलेश मुराई, नरेंद्र मुळतकर यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाई केली. फॉरेन्सिक पथकाला पाचारणघटनेचा तपास करण्यासाठी अमरावती येथून श्वानपथकासह फिंगर प्रिंट एक्सपर्ट, स्थानिक गुन्हे शाखेचे एलसीबी पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळावरील मृताच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. घटनेचा तपास युद्धस्तरावर आरंभला आहे. शवविच्छेदनानंतर युवकाची हत्याच झाल्याचे स्पष्ट होते. त्या दिशेने तपास सुरू केला असून लवकरच निष्कर्षाप्रत पोहोचू.-नितीन गवारे, ठाणेदार, दर्यापूरफॉरेन्सिक लॅबला सर्व नमुने पाठविले आहेत. शवविच्छेदनानंतर युवकाची हत्याच झाल्याचे स्पष्ट होते. त्यानुसार खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. - सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दर्यापूर