चाईल्ड लाईन घेणार जबाबदारी : जागरूक नागरिकांनी घेतला पुढाकारवैभव बाबरेकर - अमरावतीजिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात काही दिवसांपासून बेवारस फिरत असलेल्या मनोरूग्ण महिलेसोबतच्या तीन वर्षीय चिमुरडीची होणारी हेळसांड आणि समाजातील विखारी नजरांचा धोका काही जागरूक नागरिकांनी हेरला असून चाईल्ड लाईनसोबत संपर्क साधून या चिमुरडीचे भविष्य सुरक्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मागील काही दिवसांपासून एक मनोरूग्ण महिला जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या परिसरात भरकटताना दिसते. दैहिक आणि मानसिक भान हरपलेल्या या महिलेसोबत तिची चार वर्षांची चिमुरडीदेखील राहते. ही अज्ञान मुलगी आईच्या मागे-मागे फिरताना आढळते. जिल्हा सामान्य रूग्णालयात सतत रूग्णांचा व त्यांच्या नातेवाईकांचा राबता असतो. शिवाय टवाळखोरांचे काही गटही येथे कायम ठाण मांडून असतात. या मनोरूग्ण महिलेची चेष्टा, अश्लील शेरेबाजी सतत सुरू असते. या महिलेसोबत केव्हाही कोणता प्रसंग घडू शकतो. स्वत:च्या संरक्षणाचेच भान नसलेली ही महिला स्वत:च्या मुलीचे संरक्षण कसे करणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. बहुधा इर्विन रूग्णालयातील कर्मचारीदेखील या मनोरूग्ण महिलेची छेड काढताना आढळतात. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या आवारात विनाकारण बसून राहणाऱ्या टवाळखोरांवर रूग्णालय प्रशासनाचा कोणताही अंकुश नाही. त्यामुळे या मनोरूग्ण महिलेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मनोरूग्ण महिलेला तिचे नाव व पत्ता विचारला असता कधी-कधी ती चवरेनगर परिसरातील रहिवासी असल्याचे सांगते.
‘त्या’ मनोरूग्ण महिलेसोबत चिमुरडीची होतेय फरफट
By admin | Updated: October 25, 2014 22:31 IST