मंगरूळात सांस्कृतिक महोत्सव : ग्रापंचा पुढाकार, तीन हजार ग्रामस्थांची उपस्थितीधामणगाव रेल्वे : राज्याच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक व इतिहासातील अनेक घडामोडींचा देखावा ग्रामस्थांना महाराष्ट्र दर्शनातून चिमुकल्यांनी घडविला़तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील ग्रामपंचायतीच्यावतीने सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी राजेंद्र गायकवाड तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच अर्चना भोंगे, उपसरपंच कृष्णा मारोडकर, एम़बी़देशमुख, सदाशिव दाभाडे, अतुल रावेकर, हिजबुल रहमान, खंडारे, किशोर काळमेघ पेठ रघुनाथपूरचे सरपंच विजय राऊत यांची उपस्थिती होती़ जि़प़मुलींच्या शाळेने महाराष्ट्राची लोकधारा तर मुलींच्या शाळेने भारत -पाकिस्तान या दोन देशांवर आधारित ‘दो दोस्तोंकी अमर कहानी’ ही नाटिका सादर करून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले़ उर्दू शाळेतील मुलांना कवी संमेलनाच्या माध्यमातून चालू राजकीय घडामोडीचा आढावा घेतला. सांस्कृतिक महोत्सवात चंद्रभागाबाई पाखोेडे विद्यालय, संतोष गोडे विद्यालय, जि़प़च्या चार शाळा, ज्ञानदीप इंग्लिश स्कूल, नारायणदास काळमेघ स्कूल, होलीक्रॉस स्कूल, रूपचंद कुचेरीया इंग्लिश मिडीयम स्कूल यांनी सहभाग घेतला होता़ सरपंच अर्चना भोंगे व उपसरपंच कृष्णा मारोडकर यांनी अपंगांना साहित्य वाटप केले़ संचालन ग्रा़पं़सदस्य राजेश्वर कडवे, दामिनी भुजाडे, रावेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी ग्रा़पं़सदस्य मारोती फुंडे, राजेंद्र डाफ, गजानन गुल्हाने, मंगेश काळे, विलास मेश्राम, ज्योत्सना राऊत, संगीता आंबटकर, रजनी चौधरी, सुजाता लाहबर, तारा चव्हाण, विजया भबुतकर, जीजा हिवरकर आदींनी प्रयत्न केले.
चिमुकल्यांनी घडविले महाराष्ट्र दर्शन
By admin | Updated: January 30, 2016 00:16 IST