लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : मोबाईलवर गेम खेळण्याचे आमिष दाखवून एका साडेसहा वर्षीय चिमुकलीवर २१ वर्षीय युवकाने बलात्कार केला. शहरातील एका नगरात ६ जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली. नागेश नंदलाल कुरील (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.आई - वडील मजुरीला गेल्याने चिमुरडी घरी एकटीच होती. आरोपी नागेशने मोबाईलवर गेम खेळण्याचे आमिष दाखवून तिला शेजारच्या घरात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. मंगळवारी सकाळी चिमुकलीची अंघोळ घालताना तिच्या आईला तिच्या कपड्यावर रक्ताचे डाग आढळले. लगेच चिमुकलीला घेऊन तिच्या आईने दत्तापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी नागेश कुरील याला अटक केली. त्याचेविरूद्ध भादंविचे कलम ३७६, पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास दत्तापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे करीत आहे. चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.फेसबुकवर फेक नोंदआरोपी नागेश कुरील याने दोन वर्षांपूर्वी स्वत:च्या नावाने फेसबुक अकाउंट उघडले. विशेष म्हणजे ज्या महाविद्यालयात त्याने शिक्षण घेतले नाही, वा घेत नाही, अशा महाविद्यालयाचा आपण विद्यार्थी असल्याची नोंद त्याने फेसबुक वॉलवर केली आहे.
धामणगाव रेल्वेत चिमुकलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST