शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

‘चिमणी’चे काम भागवले एका ‘एक्झॉस्ट’वर

By admin | Updated: September 23, 2016 00:16 IST

विविध प्रतिष्ठानांमध्ये ज्याठिकाणी खाद्यपदार्थ तयार केले जातात तेथून धूर बाहेर पडावा यासाठी चिमणी असावी, असा एफडीएचा नियम आहे.

एफडीएचा निष्कर्ष : रघुवीर प्रतिष्ठानांचा मनमानी कारभार अमरावती : विविध प्रतिष्ठानांमध्ये ज्याठिकाणी खाद्यपदार्थ तयार केले जातात तेथून धूर बाहेर पडावा यासाठी चिमणी असावी, असा एफडीएचा नियम आहे. मात्र, रघुवीर प्रतिष्ठानाने चिमणीचे काम एका एक्झॉस्टवरच भागविल्याचे एफडीएच्या तपासणीदरम्यान निदर्शनास आले. अशा काही त्रुटींसदर्भात ‘रघुवीर’ ुप्रतिष्ठानला एफडीएकडून नोटीस बजावण्यात आली आहे. रघुवीर प्रतिष्ठानात अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे येथील कचोरीत आढळल्यास आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही, असा सूर उमटत आहे. मात्र, कचोरीतील ही अळी ग्राहकाला आढळून आल्याने रघुवीरमधील कारभाराचा भांडाफोड झाला. एफडीएने धाड टाकून शाम चौकातील रघुवीरची तपासणी करून खाद्यपदार्थ तयार केल्या जाणाऱ्या ठिकाणाची पाहणी केली. रघुवीरमधील खाद्य पदार्थ गॅस शेगडीवर बनविण्यात येतात. त्यामधून निघणाऱ्या धुरामुळे तेथील तापमान वाढते. हा धूर चिमणीच्या माध्यमातून हवेत सोडणे, हा एफडीएचा नियम आहे. मात्र, हा धूर बाहेर सोडण्यासाठी एकच ‘एक्झॉस्ट फॅन’ लावला आहे. त्यामुळे आतील धुरामुळे एक्झॉस्टच्या आसपास भाग तेलकट झाला आहे. भिंतींवर थर साचल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चिमणीच्या आधारे धूर हवेत सोडला जात नसल्यामुळे आतील तापमान वाढण्याची शक्यता असते. अशावेळी कामगार सुद्धा घामाने हैराण होतात. त्या स्थितीत कामगार खाद्यान्न तयार करीत असतील तर, ही बाब कामगारासाठी व ग्राहकांसाठी घातक ठरू शकते. (प्रतिनिधी)काय म्हणतो अन्न सुरक्षा मानदे कायदा ?अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ अधिनियम २०११ च्या तरतुदीनुसार कुठल्याही खाद्य उत्पादन व विक्री प्रतिष्ठानातील किचनरुममध्ये खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छता असावी. याठिकाणी कुत्रा, मांजर व इतर पाळीव प्राण्यांचा वावर नसावा. त्याठिकाणी हात धुण्यासाठी बेसीन अनिवार्य आहे. हॉटेलमधील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, पाण्याचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतून तपासले नमुना प्रमाणपत्र हॉटेलमध्ये असावे. हॉटेलमध्ये कार्यरत कामगारांनी पुरती शारीरिक स्वच्छता बाळगावी. डोक्याचे केस आणि हातांची नखे कापलेली असावी, या कामगारांची वैद्यकीय तपासणी नियमित करावी, त्यांनी शिंकताना किंवा खोकलताना रूमाल वापरावा, असे विविध नियम परवाना देताना एफडीएने आखून दिले आहेत. मात्र, रघुवीरमध्ये या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे.