शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीने चारशे घरांची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:18 IST

चार दिवसांपूर्वी गारपीट व मुसळधार पावसाने चिखलदरा तालुक्यात चारशेवर घरांचे नुकसान झाले, तर एक हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला.

ठळक मुद्देआदिवासी उघड्यावर : एक हजार हेक्टरचे नुकसान

आॅनलाईन लोकमतचिखलदरा : चार दिवसांपूर्वी गारपीट व मुसळधार पावसाने चिखलदरा तालुक्यात चारशेवर घरांचे नुकसान झाले, तर एक हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला.चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह, चुरणी, टेम्ब्रुसोंडा मंडळात गहू, हरभरा, मका आदी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. आदिवासी शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे. सेमाडोहमध्ये ५०० हेक्टर, चुरणी २७० हेक्टर, तर टेम्ब्रुसोंडा पट्टयात २३८ हेक्टर पिकाचे नुकसान झाले. तालुक्यात लिंंबाएवढ्या आकाराच्या गारा पडल्या. गारपीट झाल्याने आदिवासींच्या घरावरील कवेलू फुटले. काटकुंभ, चुरणी, आवागड, सेमाडोह, चुनखडी, दहेंद्री परिसरातील ४१६ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दरम्यान, मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची भेट घेतली. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या मेळघाटातील गावांतील लोकांना शासनाकडून नैसर्गिक आपत्तीमधून तात्काळ मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी धारणी व चिखलदरा या दोन्ही आदिवासी तालुक्यांना प्राधान्याने शासनाकडून मदत मिळवून देऊ, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, महासचिव जयंत आमले, धारणी तालुकाध्यक्ष आप्पा पाटील, अचलपूर तालुकाध्यक्ष रीतेश नवले, अचलपूर पंचायत समितीचे सदस्य विशाल काकड, धामणकर, राजा येवले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.पंचनामे, अहवाल सादर कराआमदार प्रभुदास भिलावेकर यांनी खडीमल येथे अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. तेथील लोकांना नैसर्गिक आपत्ती साहाय्यता निधीमधून तात्काळ मदत मिळावी, यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांना प्रत्येकाच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी नायब तहसीलदार देशमुख, मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी चतुर उपस्थित होते.