लोकमत विशेषगजानन मोहोड अमरावतीकमी-अधिक प्रमाणात मिरचीचे उत्पादन सर्वत्र होते. साधारणपणे जानेवारीपासून ठसकेबाज लाल मिरची बाजारात विक्रीसाठी येते. या हंगामात मिरची लागवण कमी झाल्याचा परिणाम आता जानवायला लागला आहे. या आठवड्यात ठोक बाजार, व बाजार समितीमध्ये ९ ते १० हजार प्रति क्विंटल लाल मिरचीचे भाव आहे. चिल्लर बाजारामध्ये १२ हजार रुपये प्रति क्विंटलने विक्री होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी मिरची तिखट झाली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर भावात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने वरुड, राजुरा, नेरपिंगळाई, चांदूर बाजार, अचलपूर आदी भागात मिरची लागवड होते. यंदा मिरचीचे पेरणी क्षेत्र कमी आहेत. त्यातच ‘कोकड्या या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे पाने खराब झाली. फुलोर गळाल्याचा फार मोठा परिणाम मिरची उत्पादनात झाला. डिसेंबर महिन्यापासून बाजारात लाल मिरचीची आवक सुरु होते. अमरावती तसेच वरुड तालुक्यामधील राजुरा येथे मिरची बाजार आहे. राजुरा बाजारात तर वर्धा, अमरावती, नरखेड, काटोल आदी ठिकाणांवरुन दररोज २०० ते २५० टन लाल मिरचीची आवक असते. यंदा फेब्रुवारी महिन्यात २ ते ३ टन मिरचीची आवक होत आहे. आवक कमी झाल्याने जानेवारीपासून राजुऱ्याचा मिरची बाजार बंद पडला आहे.
मिरची झाली तिखट !
By admin | Updated: February 19, 2015 00:23 IST