शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

ऐन दिवाळीच्या तोंडावर एटीएममध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 05:00 IST

बँकांना आता शनिवार-रविवार सुट्टी असल्याने रोख रकमेची गरज भासल्यास एटीएमकडे धाव घेण्यावर नागरिकांचा भर असतो. अशात दिवाळीच्या खरेदीला सुरुवात झाली असून, प्रसंगी पैसे काढण्यासाठी नागरिक एटीएमकडे वळतात. तेव्हा शहरातील बहुतांश एटीएम मशीन बिघडलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनात आले. काही एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्याचे आढळून येत आहे.

ठळक मुद्देशोभेची वस्तू : नागरिकांची शहरात ससेहोलपट

  लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार :  दिवाळीच्या तोंडावर शहरातील बहुतांश एटीएममध्ये ठणठणाट आहे. बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक यांच्यासह अनेक छोट्या-मोठ्या को-ऑपरेटिव्ह बँकांचे एटीएम उभारण्यात आलेले आहेत. बँकांना आता शनिवार-रविवार सुट्टी असल्याने रोख रकमेची गरज भासल्यास एटीएमकडे धाव घेण्यावर नागरिकांचा भर असतो. अशात दिवाळीच्या खरेदीला सुरुवात झाली असून, प्रसंगी पैसे काढण्यासाठी नागरिक एटीएमकडे वळतात. तेव्हा शहरातील बहुतांश एटीएम मशीन बिघडलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनात आले. काही एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्याचे आढळून येत आहे.स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँकांचे एटीएम  बँक शाखेला लागूनच आहे. मात्र हे एटीएम अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. याकडे शाखा व्यवस्थापकाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम बंद अवस्थेत असल्याचा अनेक ग्राहकांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांतर्फे नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :atmएटीएम