शुभम बायस्कर दर्यापूरसंपूर्ण वाघमारे कुटुंबीय शुक्रवारी आगीत भस्मसात झाले. शव विच्छेदनानंतर त्यांच्यावर शुक्रवारी रात्री १० वाजता सामूहिक अंत्यसंस्कार करून मृताच्या भावाने भडाग्नी दिली. अख्खे कुटुंब मुत्यूच्या दाढेत लोटले गेल्यामुळे संपूर्ण गाव नि:शब्ध झाले होते. मार्कंडा येथे घराला लागलेल्या आगीत चंदा वाघमारे, नीलेश वाघमारे, समर्थ वाघमारे व समृध्दी वाघमारे यांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची महिती पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. ही हद्यद्रावक घटना पहिल्यांदाच घडल्यामुळे गावातील नागरिकांचे कंठ दाटून आले होते. घटनेच्या काही तासांपूर्वीच सकाळी लाडकी समृध्दी व समर्थ परिसरात खेळले, बागळल्याच्या आठवणी परिसरातील महिला सांगत होत्या. घरातील नातवंड,कर्ता मुलगा व कर्तबगार सुनीने म्हतार वयात साथ सोडल्यामुळे आता जीवन जगावे तर कुणासाठी जगावे, पोटाचा गोळा व नातवंड क्षणात निघून गेलेल्या आई कमलाबार्इंनी असा हंबरडा फोडला. अग्नकांडात जळत असतांना मदतीची हाक मागणाऱ्या वाघमारे परिवाराला आपण मदत करु शकलो नाही. ही आयुष्यभराची खंत गावकऱ्यांच्या मनात घाव करुन गेली. शुक्रवारी गावात कुणाच्याही घरात चुली पेटल्या नाहीत. आपला पाठराख्या भाऊ सोडून गेल्याचे दु:ख घटनेनंतर गावात आलेल्या निलेशच्या बहिणीच्या मनात होते. ती ओक्साबोक्सी रडली. मात्र आता कुणीच आपल्याला दिसणार नाही. या निष्पाप भावना तिच्या मनाशी होत्या. उपविभागीय अधिकारी ईब्राहीम चौधरी, तहसीलदार राहुल तायडे, महसूल विभागाचे कर्मचारी मंडळ अधिकारी, पोलीस पाटील व नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दाम्पत्यांसह मुलांना साश्रुनयनांनी निरोप
By admin | Updated: May 22, 2016 00:04 IST