शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात बालमृत्यूचे तांडव, शेकडो बालक आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:19 IST

मेळघाटच्या धारणी तालुक्यात १५ दिवसांत तब्बल ३०, तर चिखलदरा तालुक्यात ६ अशा एकूण ३६ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील एकट्या बिजुधावडी आरोग्य केंद्राअंतर्गत १० बालकांचा समावेश असून, दोन्ही तालुक्यांत शेकडो बालक सर्दी खोकला ताप या आजाराने ग्रस्त असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेत खळबळ : १५ दिवसांत ३६ बालके दगावली

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटच्या धारणी तालुक्यात १५ दिवसांत तब्बल ३०, तर चिखलदरा तालुक्यात ६ अशा एकूण ३६ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील एकट्या बिजुधावडी आरोग्य केंद्राअंतर्गत १० बालकांचा समावेश असून, दोन्ही तालुक्यांत शेकडो बालक सर्दी खोकला ताप या आजाराने ग्रस्त असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहेधारणी तालुक्यात १५ दिवसांत ३० कुपोषित बालकांनी अखेरचा श्वास घेतला, तर बिजुधावडी अंतर्गत येणाऱ्या २३ गावांमध्येच १० बालकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. चिखलदरा तालुक्यात ६ बालके दगावलीत. आॅगस्ट महिन्यात धारणी तालिक्यात ४५, चिखलदरा तालुक्यात ९ बालकांचा मृत्यूची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरून गेली होती. त्यानंतर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिले होते. परंतु, पंधरा दिवसांतच ३६ बालकांचा मृत्यू झाले आहेत.शेकडो बालक सर्दी, खोकला, तापाने ग्रस्तधारणी व चिखलदरा तालुक्यातील शेकडो बालक सर्दी खोकला तापाने फणफणत आहेत. आरोग्य यंत्रणेने याला दुजोरा दिला असून एकूण बालकांपैकी ५० टक्के बालक ग्रस्त असल्याने त्यांना निमोनियापासून वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे.आजारावर जादूटोणा भूमकाचा उपचारमेळघाटात आजही आदिवासी भूमका (मांत्रिक)कडे उपचार घेतात. सर्दी खोकलासाठीसुद्धा आरोग्य केंद्रात येत नसल्याने आरोग्य विभागाची कसरत होत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत पवार यांनी सांगितले. दुसरीकडे सर्व औषधसाठा, तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णवाहिका असल्याचे सांगण्यात आले. मात्र बालमृत्यूचे प्रमाण कमी वाढतच आहेधारणी तालुक्यात १५ दिवसांत ३० बालकांचा मृत्यू झाला. एकट्या बीजुधावडी आरोग्य केंद्रात १० बालकांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्दी, खोकला, तापाने मोठ्या प्रमाणात बालक ग्रस्त आहेत. आरोग्य केंद्रात त्यांना भरती केल्या जात आहे.- शशिकांत पवार,तालुका आरोग्य अधिकारी, धारणी