शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पोरका झालेल्या चिमुकल्याला चाईल्ड लाईनचा निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 01:22 IST

रेल्वेच्या धडकेत आई व बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर दोन वर्षीय बालक बचावला. सांभाळ करणारे वडीलही बे्रनट्युमरचे आजारी. अशा स्थितीत दोन वर्षीय चिमुकल्यावर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. सुदैवाने चाइल्ड लाइनची साथ चिमुकल्याला मिळाली आणि त्यांनी चिमुकल्याच्या निवाऱ्याची सुविधा केली.

ठळक मुद्देरेल्वेखाली आई व बहिणीचा मृत्यू : दोन वर्षांच्या मुलगा आढळला उन्हातान्हात भटकताना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वेच्या धडकेत आई व बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर दोन वर्षीय बालक बचावला. सांभाळ करणारे वडीलही बे्रनट्युमरचे आजारी. अशा स्थितीत दोन वर्षीय चिमुकल्यावर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. सुदैवाने चाइल्ड लाइनची साथ चिमुकल्याला मिळाली आणि त्यांनी चिमुकल्याच्या निवाऱ्याची सुविधा केली. चांदूररेल्वे परिसरात उन्हातान्हात भटकणाºया त्या चिमुकल्याला ईशदया बालगृहात ठेवण्यात आले आहे.चांदूर रेल्वे परिसरात दोन वर्षांचा मुलगा एकटाच उन्हात भटकत असल्याची माहिती एका व्यक्तीने चाइल्ड लाइनच्या १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर दिली होती. त्याच्यासोबत कोणीही नाही, त्यामुळे त्याला निवारा व पोषणाचे सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्या व्यक्तीने चाइल्ड लाइनकडे केली. या माहितीच्या आधारे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील चाइल्ड लाइनच्या पदाधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीशी संपर्क करून अधिक माहिती जाणून घेतली. त्यानंतर तत्काळ चाइल्ड लाइनच्या पदाधिकाºयांनी चांदूररेल्वे गाठून घटनास्थळी भेट दिली. त्यांनी मुलाच्या वडिलांची भेट घेऊन त्यांच्याकडून सर्व घटनाक्रम जाणून घेतला. त्यावेळी वडील दोन वर्षीय मुलाच्या पालन पोषणासाठी असमर्थ असल्याचे चाइल्ड लाइनच्या निदर्शनास आले. त्यामुळे चाइल्ड लाइनने बालकल्याण समितीशी संपर्क साधून मुलाची माहिती दिली. त्यानंतर चांदूर रेल्वे येथून चाईल्ड लाईन सदस्यांनी मुलाला व वडिलांना बालकल्याण समिती समक्ष हजर केले. बालकल्याण समितीने सदर प्रकरणाची शाहनिशा करून मुलाला निवारा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आदेशानुसार चाइल्ड लाइनच्या सदस्यांनी मुलाला तात्पुरता निवारा बालगृहात उपलब्ध करून दिला. सदर मुलाच्या भविष्यच्या दृष्टीने योग्य तो निर्णय बालकल्याण समिती घेईल. त्या बालकाच्या वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत अमरावती येथील चाइल्ड लाइनचे सदस्य त्या मुलाची देखरेख करणार आहेत.चाईल्ड लाईन बनली देवदूतसदर प्रकरणामध्ये हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैध, माधुरी चेंडके, चाइल्ड लाइन संचालक डॉ.सूर्यकांत पाटील, प्रशांत घुलक्षे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. समन्वयक फाल्गून पालकर, समुपदेशक अमित कपूर, टीम मेंबर पंकज शिनगारे, मीरा राजगुरे, सरिता राऊत, अजय देशमुख, शंकर वाघमारे, सुरेंद्र मेश्राम व स्वयंसेवक चेतन वरठे यांनी प्रकरणाच्या पाठपुराव्यात सहकार्य केले. त्यामुळे त्या चिमुकल्यासाठी चाइल्ड लाइन देवदूत बनल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.काय घडले चिमुकल्यासोबत?२६ फेब्रुवारी २०१९ रोजी पती-पत्नीत वाद झाला. पत्नी रागाच्या भरात मुलगी व मुलाला घेऊन घराबाहेर पडली. तिने रेल्वे स्टेशन गाठले. दोन मुलीसह आई रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेखाली रेल्वेखाली, तर मुलगा हातातून सुटून रुळाबाजूला पडला. मुलगी व आईचा जागीच मृत्यू झाला. त्या मुलाचा जीव वाचला, मात्र, त्याच्या जीवनातील पुढील प्रवास कठीण झाला. वडील मुलाचा सांभाळ करीत होते. मात्र, त्यांना ब्रेन ट्युमरचा आजार जडला होता. आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने वडील मुलाच्या संगोपनात असमर्थ ठरले आणि चिमुकल्यावर भटकतींची वेळ आली.