शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अनैसर्गिक कृत्यातून मुलगा ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:29 IST

ठार मारण्याची धमकी देऊन एका अल्पवयीनाने अन्य लहान मुलावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केला. अत्याचारग्रस्त मुलाला आता एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. याप्रकरणी विधी संघर्षित बालकाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये भातकुली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी गैरअर्जदार बालकाच्या वडिलांना नोटीस बजावून सोमवारी हजर राहण्यास सांगितले.

ठळक मुद्देभातकुली हद्दीतील धक्कादायक घटना : विधी संघर्षित मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ठार मारण्याची धमकी देऊन एका अल्पवयीनाने अन्य लहान मुलावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केला. अत्याचारग्रस्त मुलाला आता एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. याप्रकरणी विधी संघर्षित बालकाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये भातकुली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी गैरअर्जदार बालकाच्या वडिलांना नोटीस बजावून सोमवारी हजर राहण्यास सांगितले.भातकुली हद्दीतील एकाच गावात दोन मुले शेजारी राहतात. पीडित बालकाची प्रकृती बिघडल्याने वडिलांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यावेळी तो एचआयव्हीबाधित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हादरलेले वडील व डॉक्टरांनी त्या मुलाला विश्वासात घेतले असता, धक्कादायक प्रकार उघड झाला. सहा महिन्यांपासून घरामागे राहणारा एक मुलगा त्याच्या घरी नेऊन अनैसर्गिक कृत्य करीत असल्याचे त्या बालकाने डॉक्टर व वडिलांना सांगितले.अनैसर्गिक कृत्याबाबत कोणाला सांगशील, तर जिवाने मारून टाकेन, अशी धमकी दिल्याने पीडित बालकाने कोणाचजवळच वाच्यता केली नाही. या प्रकाराची पीडित मुलाच्या वडिलांनी रविवारी सायंकाळी भातकुली पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी एका १६ वर्षीय विधी संघर्षित बालकाविरुद्ध भादंविच्या कलम ३७७, ५०६ (ब) व ६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम यांनी केला. पोलिसांनी पीडित बालकाची वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांचा अहवाल प्राप्त केला आहे. सोमवारी गैरअर्जदार बालकास पोलिसांनी बोलाविले होते. सोमवारी पोलिसांनी गैरअर्जदार बालकाची इर्विन रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्याला मंगळवारी बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाईल. मंडळाच्या आदेशाने पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.गावात एड्सग्रस्तांची संख्या अधिकभातकुली हद्दीतील ज्या गावात ही घटना घडली, तेथे एड्सग्रस्तांची संख्या अधिक असल्याची बाब पोलीस चौकशीदरम्यान कानावर पडली. या गावात आरोग्य यंत्रणेकडून शिबिरसुद्धा घेण्यात आले होते. नागपूर व मुंबई येथील आरोग्य विभागाची पथके अनेकदा त्या गावात आरोग्य तपासणी शिबिर घेत असल्याचेही बाब पुढे आली आहे. अनैसर्गिक कृत्य करणारा बालक एड्सग्रस्त असल्यामुळे पीडित बालकालाही त्याची लागण झाली असावी, अशी चर्चा गावात सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.अनैसर्गिक कृत्याच्या प्रकरणात संबंधित बालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मंगळवारी त्या बालकास बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाईल.- पंकज दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक, भातकुली