शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण काढण्यात पालिकेकडून भेदभाव

By admin | Updated: April 23, 2016 00:11 IST

शहराला अतिक्रमणाचा विळखा असताना नगरपरिषदेने ते काढण्याची अजूनही हिंमत दाखविली नाही.

स्वयंघोषित नगरसेवकाचा दबाव : वयोवृद्धाची अतिक्रमित भिंत तोडलीअचलपूर : शहराला अतिक्रमणाचा विळखा असताना नगरपरिषदेने ते काढण्याची अजूनही हिंमत दाखविली नाही. परंतु एका वयोवृद्धाने श्रमाच्या पैशातून बांधलेली घराची भिंत तोडली. त्यासाठी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. भिंत पाडल्याने वयोवृद्धाचे घर उघडे पडले आहे. ही कारवाई एक नगरसेवक व एका नगरसेविकेच्या पतीच्या दबावाने केल्याची माहिती आहे. अश्रफपुरा येथे मो. हनीफ मो. इस्माईल (७५) यांचे घर आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी घराच्या उत्तर दिशेला आडोसा म्हणून भिंत बांधली होती. २ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी पोलीस पथकासह मोठा लवाजमा घेऊन तेथे हजर झाले. त्यांनी हनीफ यांच्या घराची भिंत तोडण्यास सुरूवात केली तेव्हा ते अक्षरश: साश्रूनयनांनी विनंती करीत होते. माझी भिंत पाडू नका, माझे घर उघडे पडेल, मी कष्टाच्या पैशातून बांधली आहे. पण संबंधित अधिकाऱ्यांच्या कानात त्यांची आर्त विनवणी शिरली नाही. भिंत पाडल्यानंतर तिच्या विटाही ते सोबत घेऊन गेले. ही अतिक्रमण हटवण्याची कारवाई करताना तो नगरसेवक व नगरसेविकेचा पती दोघेही तेथे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)न्यायालयाचे दरवाजे ठोठावणारभिंत पाडल्याप्रकरणी मो. हनीफ मो. इस्माईल यांनी पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना वकील अ‍ॅड. व्ही. आर. घाटे यांच्यातर्फे नोटीस पाठविली. त्यात 'माझ्या कष्टाच्या पैशातून पै जमवून मी भिंत बांधली होती. माझे घराचे मोजमाप न करता संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा नकाशा किंवा रेकॉर्ड सोबत न आणता माझ्या घराची भिंत पाडली. यावेळी नगरपरिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी चार पोलिसांसह अतिक्रमण विरोधी पथक सोबत आणले होते. खास दोन नगरसेवकांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली असून त्यांची नावे त्यांनी नोटीसमध्ये लिहिले आहे. माझ्या शेजारी असलेल्यांचे अतिक्रमण केलेले बांधकाम काढले नाही. ती बांधकामे कोणाची आहे, याचा उल्लेख पाठविलेल्या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. नोटीस मिळताच माझ्या पाडलेल्या भिंतीच्या विटा परत करून माझे झालेले १२ हजार रुपयांचे नुकसान भरून द्यावे', असेही नोटिसीत म्हटले आहे.