शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील ‘बच्चे कंपनी’ हुश्शार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2016 23:59 IST

पायाभूत चाचणीमध्ये माघारलेली बच्चे कंपनी शैक्षणिक प्रगती चाचणीत अव्वल ठरली आहेत.

पायाभूतमध्ये माघारली : प्रगती चाचणीत अव्वलप्रदीप भाकरे अमरावतीपायाभूत चाचणीमध्ये माघारलेली बच्चे कंपनी शैक्षणिक प्रगती चाचणीत अव्वल ठरली आहेत. इयत्ता दुसरी ते चवथीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांनी भाषा व गणित या उभय विषयांमध्ये सरासरी ७० टक्क्यांच्यावर गुण मिळविले आहे. ५ व ६ एप्रिलला होणाऱ्या संकलित - २ चाचणी परीक्षेपूर्वी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने दत्तक घेतलेल्या ४५९ शाळांमधून प्रगत शैक्षणिक चाचणी घेतली. ८ ते १० मार्च या कालावधीत घेतलेल्या या चाचणीला दुसरी ते चवथीचे सुमारे १८ हजार विद्यार्थी सामोरे गेले. भाषा (मराठी) व गणित या दोन विषयासंदर्भात ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे निष्कर्ष नुकतेच हाती आलेत. या निष्कर्षानुसार सप्टेंबर १५ मध्ये घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणीच्या तुलनेत विद्यार्थ्यांची क्षमता वाढीस लागली आहे. क्षमतेवर आधारित प्राथमिक शिक्षणावर भर देतानाच शालेय शिक्षण विभागाने ‘ज्ञान रचनावाद’ स्वीकारला आहे. साहित्य निर्मिती करण्यात आली.विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाचे धडेअमरावती : विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी त्याला स्वयंअध्ययनाचे धडे दिले जातात. मराठी भाषा व गणितामध्ये मुले माघारल्याचे लक्षात येताच येथील डायटने दत्तक घेतलेल्या शाळांसह जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ज्ञान रचनावादी अध्ययन पद्धतीचा वापर करून कृतीयुक्त उपक्रम राबविले. डायटच्या प्राचार्य हर्षलता बुराडे यांच्यासह ज्येष्ठ अधिव्याख्याता मिलिंद कुबडे, अधिव्याख्याते पवन मानकर व प्रवीण राठोड यांनी शाळांना भेटी देऊन शिक्षकांना प्रेरणा दिली. शैक्षणिक साहित्याचा वापर करून भाषा-गणित विषयाचा सराव करून घेतला. दत्तक शाळातील शिक्षकांचे प्रेरणा शिबिर घेतले. साधन व्यक्तींद्वारे शाळा, शिक्षकांना गुणवत्तेबाबत प्रोत्साहन दिले व त्यानंतर भाषा व गणित विषयांमध्ये प्रगत होण्याच्या दृष्टिकोनातून संकलित २ पूर्वी ४५९ शाळांमध्ये १८ हजार विद्यार्थ्यांचे प्रगत शैक्षणिक चाचणी घेतली. त्यात पायाभूतच्या तुलनेत विद्यार्थ्यांमध्ये भाषा व गणित या उभय विषयांची सांघिक क्षमता वाढून आल्याचे निरीक्षण डायटने नोंदविले आहे. ५ व ६ एप्रिलला संकलित - २ चाचणीप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ५ व ६ एप्रिल २०१६ रोजी संकलित २ चाचणी राज्यात सर्वदूर होणार आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, जिल्हा परिषदा, नगरपालिका, खासगी शाळा, अनुदानित - विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित या सर्व शाळांना ही चाचणी लागू राहील. तसेच राज्याच्या हद्दीतील राज्य मंडळासह अन्य सर्व परीक्षा मंडळाच्या सर्व माध्यमांच्या संलग्न शाळांमध्ये ही चाचणी घेण्यात येणार आहे. साधन व्यक्ती, अधिव्याख्याते, पर्यवेक्षक आदी सर्वांच्या सहाय्याने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढीवर भर देण्यात आला. प्रगत शैक्षणिक चाचणीचा उत्तम निकाल त्याचाच परिपाक होय. आता संकलित दोन चाचणी उत्तमरीत्या घेण्यावर भर आहे.- हर्षलता बुराडे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था.