शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

अल्पवयिनांनो सावधान, तुमच्यावर पोलिसांची नजर!

By admin | Updated: February 2, 2016 00:07 IST

कधी पोलिसांची नजर चुकवत तर कधी निडरपणे वाहन हाकणाऱ्या अल्पवयिनांवर पोलिसांची करडी नजर आहे.

सहायक पोलीस अधीक्षकांचे निर्देश : विनाक्रमांकाच्या वाहनांवर कारवाईअमरावती : कधी पोलिसांची नजर चुकवत तर कधी निडरपणे वाहन हाकणाऱ्या अल्पवयिनांवर पोलिसांची करडी नजर आहे. वाहनपरवाना आणि वय पूर्ण नसताना हे अल्पवयीन विद्यार्थी कधी ट्रिपलसिट तर कधी चौबलसिट वाहने हाकतात. त्यावर आता वाहतूक पोलिसांकडून अंकुश लागणार आहे. तसे निर्देशच सहायक पोलीस आयुक्त बळीराम डाखोरे यांनी दिले आहेत. नवनियुक्त पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक आणि उपायुक्त नितीन पवार या द्वयीने शहरातील अनियंत्रित वाहतूक व्यवस्था सुधारण्याचे निर्देश दिल्याने मागील काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी विनाक्रमांकाच्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अल्पवयीन मुलांचे दुचाकी प्रेम ‘लोकमत’ने सोमवारी चित्रमय वृत्ताद्वारे वाचकांसमोर ठेवले होते. त्याची दखल घेत शाळा, आणि महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांनी पायी गस्ती वाढवून चाणाक्षपणे अशा वाहनचालकांवर कारवाई केली. तसेच अशी वाहने आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. अशा अल्पवयीनांवर कायदेशीर कारवाई करू, अशी ग्वाहीदेखील प्रभारी एसीपी बळीराम डाखोरे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)अल्पवयीन वाहन चालकांवर अंकुश घालाअमरावती : बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींवर कायमस्वरुपी अंकुश लावावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सोमवारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पोलीस उपायुक्त नितीन पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. ‘यांच्यावर अंकुश कुणाचा?’ या वृत्तातून ‘लोकमत’ने अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून बेदरकारपणे होणाऱ्या वाहतुकीवर प्रकाश टाकला. त्याची दखल घेत विद्यार्थ्यांनी उपायुक्तांची भेट घेत, अशा वाहनचालकांविरुद्ध धडक मोहीम राबविण्याची विनंती केली. ही मोहीम औटघटकेची न ठरता यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी शुभम देशमुख, प्रतीक देशमुख, राहुल जायले, विवेक उमक, अक्षय दरवई, रोहित खंडारे, जय देशमुख, शुभम डिवरे, अक्षय ओलीवकर आणि वैभव जपुलकर यांनी केली आहे. शहरातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी तोंडाला रुमाल बांधून विनापरवाना वाहने चालवितात. त्यांना दंड न ठोठावता थातूरमातूर कारवाई करून वाहतूक पोलीस खिसे भरतात, असा आरोपही त्यांनी केला.(प्रतिनिधी)