शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
3
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
4
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
5
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
7
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
8
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
9
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
10
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
11
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
12
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
13
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
14
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
15
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
16
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
17
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
18
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
19
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
20
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब

चिखलदरा तहसीलवर महिलांचा 'घागर मोर्चा'

By admin | Updated: May 14, 2016 00:13 IST

शेकडो योजना राबवूनदेखील आदिवासींच्या नशिबातील मरणयातना संपल्याच नाहीत़ कोसोदूर अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागते़.

तहसीलच्या आवारात फोडल्या घागरी : पाणीटंचाईचा प्रश्न पेटलाचिखलदरा : शेकडो योजना राबवूनदेखील आदिवासींच्या नशिबातील मरणयातना संपल्याच नाहीत़ कोसोदूर अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागते़. माजी जिल्हा परिषद सदस्या संगीता ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शासनाच्या विरोधात चिखलदरा तहसीलवर विराट आदिवासी महिलांचा घागर मोर्चा काढून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी तहसीलदारांना पिण्याच्या पाण्यासाठी निवेदन दिले़. मेळघाटातील आदिवासींना आजस्थितीत ४५ डिग्री तापमानात पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागते़ एकीकडे शहरी भागात शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत असला तरी मेळघाटातील पाण्याची समस्या मिटलेली नाही़ भरउन्हात आपली तहान भागविण्यासाठी वणवण भटकणाऱ्या आदिवासींना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आ़मदार राजकुमार पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य संगीता ठाकरे यांच्या नेतृत्वात चिखलदरा तहसीलवर शासनाच्या विरोधात पाण्यासाठी आदिवासी महिलांचा घागर मोर्चा काढण्यात आला़ नगर परिषदपासून हा मोर्चा निघाला़ डोक्यावर घागरी घेऊन शेकडो महिला तहसीलकडे वाटचाल करीत होत्या. हे दृश्य पाहून अनेकांचे लक्ष वेधले जात होते़. तहसील कार्यालयात पोहोचून पाण्याची समस्या तातडीने सोडविण्याबाबत तहसीलदार किशोर बागडे यांना निवेदन दिले़. यावेळी महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल ठाकरे, तालुकाध्यक्ष अरूण सपकाळ, महिला अध्यक्ष किरण घोडके, शंभूदादा खडके, गजेंद्र कस्तुरे, नगरसेवक कल्पना खांडे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सेवा दल व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़. (तालुका प्रतिनिधी)सरकारच्या रागावर फोडल्या घागरीअनेकदा पाणीटंचाई संदर्भात निवेदने देऊनसुद्धा आज अद्यापपावेतो पाऊल उचलले नाही़ त्यामुळे शासनाच्या व प्रशासनाच्या सरणावर शेवटची मडकी फोडण्यास आम्ही मेळघाटातील रहिवासी तयार आहोत, असे म्हणून तहसील कार्यालयाच्या आवारात मडकी फोडून शासनाचा निषेध करण्यात आला़. आया-बहिणींचा त्रास केव्हा संपणार?गत अनेक वषार्पासून मेळघाटातील आदिवासींना न्याय मिळाला नाही. आज आमच्या आदिवासी महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तरीदेखील शासनाला जाग आली नाही. राज्य सरकारला आदिवासींप्रती संवेदना संपल्या असून आमच्या माय बहिणींचा त्रास केव्हा संपणार असा प्रश्न माजी जिल्हा परिषद सदस्या संगीता ठाकरे यांनी उपस्थित केला.