शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

चिखलदरा-मेळघाट पर्यटन महोत्सव

By admin | Updated: January 22, 2017 00:13 IST

विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळी दरवर्षी साजरा होणारा पर्यटन महोत्सव यावर्षी आता चिखलदरा मेळघाट-महोत्सव....

विविध कार्यक्रमांची मेजवानी : पर्यटकांसाठी मनोरंजन, खवय्येगिरीवर भरचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळी दरवर्षी साजरा होणारा पर्यटन महोत्सव यावर्षी आता चिखलदरा मेळघाट-महोत्सव या नावाने २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान विविध रंगारंग कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार असून त्यादृष्टीने चिखलदरा नगरपरिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व तहसील प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे.या महोत्सवात देशभरातील पर्यटकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात राहील. यावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. पर्यटन महोत्सव नियोजनाच्या दृष्टीने पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याअगोदरच पार पडली आहे. पर्यटन महोत्सव आयोजनाबाबत जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी जिल्हास्तरावरून वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहेत.प्रसिद्धीवर विशेष भरएकेकाळी हील स्टेशन असलेल्या पर्यटन महोत्सवामध्ये देश-विदेशातील पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होत असे. त्याच धर्तीवर चिखलदराचे सौंदर्य, नैसर्गिकरीत्या खुलवत पुन्हा देश-विदेशातील पर्यटकांची महोत्सवासह पूर्ण वर्षभर उपस्थिती राहावी, त्यांची संपूर्ण व्यवस्थेच्या दृष्टीने प्रसिद्धीवर विशेष भर देण्यात आला आहे.चारही दिवस लावणीचिखलदरा-मेळघाट पर्यटन महोत्सव २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान साजरा होत असताना या महोत्सवात हास्य कविसंमेलन, भरत गणेशपुरे यांचे ‘चला हवा येऊ द्या’ यासोबतच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे नियोजन असून चारही दिवस महाराष्ट्रीयन लावणी विशेष आकर्षण म्हणून ठेवण्यात आली आहे. सोबतच मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृतीचे दर्शन पर्यटकांना घडावे, यावरही पहिल्यांदाच मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या खास आग्रहास्तोवर आदिवासी नृत्य स्पर्धासुद्धा राहणार आहे. त्या स्पर्धेला जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बक्षीस जाहीर केले आहे. (तालुका प्रतिनिधी)पालकमंत्र्यांचे खास लक्षविदर्भाचे नंदनवन असलेले चिखलदरा-मेळघाट पर्यटन महोत्सवात पालकमंत्री प्रवीण पोटे व अमरावतीचे आमदार सुनील देशमुख यांनी विशेष लक्ष देऊन पर्यटकांकरिता जंगल सफारी, गाविलगढ भ्रमण, विविध दर्शनीय पॉईन्टवर व्हॅली क्रॉसिंग, पॅराग्लायडींग, जैवविविधतेसह कॉफी मळे, नौका विहार आदी मनोरंजनात्मक बाबी पुरविण्यावर खास लक्ष दिले आहे. दुसरीकडे सदर महोत्सवामध्ये विविध रंगारंग कार्यक्रमांसह खवय्येगिरी करणाऱ्या पर्यटकांकरिता महाराष्ट्रीयन मेन्यूू चांगल्या पद्धतीने सादर व्हावा यावर सुद्धा विशेष भर देण्यात येणार आहे. विविध समिती होणार गठितचिखलदर-मेळघाट पर्यटन महोत्सवादरम्यान देशभरातील येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये, याकरिता जिल्हाधिकारी किरण गित्ते, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात चिखलदऱ्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, नगरसेवक अरुण तायडे, प्रवीण येवतीकर, पालिका व तहसील कर्मचारी यांचेसह स्थानिक व्यावसायिक, हॉटेल ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी, गावकरी यांच्या विविध समिती गठित होणार आहेत.