शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
2
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
3
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
4
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
5
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
6
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
7
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
8
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
9
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
11
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
12
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
13
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
14
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
15
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
16
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
17
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
18
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
19
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
20
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या

चिखलदरा @३७ डिग्री सेल्सिअस; यावर्षीची सर्वाधिक नोंद

By admin | Updated: May 23, 2015 00:42 IST

विदर्भाचे एकमेव पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदरा नंदनवनात शुक्रवारी येथील सिपना महाविद्यालयाच्या तापमान केंद्रावर ३७....

नरेंद्र जावरे चिखलदराविदर्भाचे एकमेव पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदरा नंदनवनात शुक्रवारी येथील सिपना महाविद्यालयाच्या तापमान केंद्रावर ३७ डिग्री सेल्सिअसची नोंद झाली. शहरी भागात तापमानात वाढ झाल्याने त्याचा फटका चिखलदरासारख्या पर्यटन स्थळाला बसला आहे. येथे येणाऱ्या उन्हाळी पर्यटकांची संख्या रोडावत आहे.चिखलदरा विदर्भाचे एकमेव पर्यटन स्थळ असताना प्रशासनाच्या दुर्लक्षाने होत असलेली वृक्षतोड नंदनववाच्या मुळावर आली आहे. यासह अन्य कारणांमुळे थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदऱ्यातही तापमान वाढत आहे. कधीकाळी उन्हाळ्यातही असणारे हजारो पर्यटकांची गर्दी लुप्त होत आहे. पर्यटन स्थळाचा विकास सिडकोमार्फत होणार असल्याने राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. सिडको अंतर्गत किमान दहा वर्षे लागणार असल्याने तोपर्यंत पर्यटन स्थळाची अवस्था बकाल होण्याची भीती वर्तविली जात आहे.ओस पडले पर्यटन स्थळ चिखलदरा पर्यटन स्थळावरील उन्हाळ्यात गत काही वर्षांपर्यंतचे तापमान २८ ते ३२ डिग्री सेल्सिअसपर्यंत गेल्याची नोंद आहे. चिखलदरा पर्यटन स्थळासह परिसराला लागून असलेल्या वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. पूर्वी हिरव्या झाडांनी गजबजलेल्या आलाडोह, लवादा, मोथा, शहापूर आदी गावातील शेत जमिनीवर ले-आऊट पडले आहेत. परिणामी ओसाड जमिनी पर्यटकांची निराशा करणाऱ्या ठरत आहेत. या शेतजमिनीवर पूर्णत: वृक्षलागवड करुन चिखलदरा पर्यटन स्थळाला गतवैभव आणण्याची मागणी पर्यटनप्रेमींनी केली आहे.चिखलदरा पर्यटन विकासासाठी राज्य शासनाला विविध प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. येथे पर्यटकांची संख्या वर्षभर कायम रहावी यासाठी शासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. पिण्याचे पाण्याच्या मुद्यावर लक्ष देणेही महत्त्वाचे आहे.- राजेंद्रसिंह सोमवंशी, नगराध्यक्ष, न.प. चिखलदरा.