शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री : अपंग पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण, निवासी अंध विद्यालयाला भेट

By admin | Updated: February 6, 2016 00:06 IST

अपंगांसाठी लवकरच नवीन धोरण जाहीर केले जाईल.

अपंगांसाठी नवीन धोेरण चांदूरबाजार/चिखलदरा : अपंगांसाठी लवकरच नवीन धोरण जाहीर केले जाईल. त्याचप्रमाणे राज्यातील अंध, अपंगांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास अभियानांतर्गत राज्यात विशेष कार्यक्रम राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णामाय अपंग पुनर्वसन केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. चिखलदरा येथील राष्ट्रीय अपंग कल्याण संस्थे (नॉफ)द्वारा संचलित निवासी अंध विद्यालयाच्या रौप्य महोत्सवाप्रसंगीही त्यांनी उपस्थिती दर्शविली. चांदूरबाजार येथील कार्यक्रमात पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. बच्चू कडू, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, इंदिराबाई कडू आदींची उपस्थिती होती, तर चिखलदरा येथील निवासी अंध विद्यालयाच्या रौप्य महोत्सवात पालकमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसह खासदार आनंदराव अडसूळ, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. सुनील देशमुख, आ. रवी राणा, आमदार अनिल बोंडे, रमेश बुंदिले, श्रीकांत देशपांडे, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील आणि संस्थेचे अध्यक्ष चंद्र्रकांत कलोती प्रामुख्याने उपस्थित होते. चांदूरबाजार येथे बोलताना मुख्यमंंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळण्यासाठी विदर्भात प्रक्रिया उद्योग उभारले जाणे आवश्यक आहे. सिंचनावर कोट्यवधी रूपये खर्च करूनही सिंचनाचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने शेतकऱ्यांची दुर्दशा झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी लवकरच विदर्भात प्रक्रिया उद्योग आकाराला येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. याकार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नयना कडू यांनी केले. याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऋषिकेश उपाध्ये यांस तीनचाकी सायकल प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे वामन नथ्थूजी दुधे या अपंग लाभार्थ्याला घरकुलाचा धनादेश प्रदान करण्यात आला. आपण विदर्भाच्या विकासासाठी बांधिल असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.‘नॉफ’द्वारे दुष्काळग्रस्तांसाठी ७१ हजारांची मदतयावेळी राष्ट्रीय अपंग कल्याण (नॉफ) संस्थेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून ७१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला.चांदूरमध्ये विविध घोषणा पूर्णामाय पुनर्वसन केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी आ.बच्चू कडू यांच्या सेवाभावाचे कौतुक केले. अपंगांच्या पुनर्वसनाबाबत राज्य शासन सहृदयी प्रयत्नरत असल्याचे ते म्हणाले. विविध घोषणा करीत कृषी कौशल्य महाविद्यालयासोबत बेलोरा- गणोजा- पूर्णा प्रकल्पावरील योजना कार्यान्वितकरण्याचे आदेश त्यांनी दिले. बोर्डी नाला, चंद्रभागा, करजगाव या प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.