शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

मुख्यमंत्री साहेब, चिखलदऱ्यासाठी एवढे कराच!

By admin | Updated: February 5, 2016 00:23 IST

मुख्यमंत्री पुन्हा एकदा विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांना चिखलदरा या महत्त्वाच्या पर्यटनस्थळाच्या

विकासाची प्रतीक्षा : पाणी, सिडकोे विकासाला गती, आंतरराष्ट्रीय मार्ग वळवा, पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढतोयनरेंद्र जावरे चिखलदरामुख्यमंत्री पुन्हा एकदा विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांना चिखलदरा या महत्त्वाच्या पर्यटनस्थळाच्या रखडलेल्या विकासाची जाणीव आणि आठवण करून देणे गरजेचे आहे. चिखलदरा तालुक्याला परवाच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हगणदारी मुक्तीचा विभागातील प्रथम पुरस्कार देण्यात आला. मात्र, येथील इतर सुविधांची पूर्तता करण्याची गरज आहे. त्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष पुरवावे, अशी येथील नागरिकांना अपेक्षा आहे. चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन आहे. येथे पर्यटकांचा ओढादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. येथे वाढत चाललेले सिमेंट क्राँक्रीटचे जंगल रोखण्याचीही नितांत गरज आहे. त्यासाठी सिडकोची घोषणा झाली. ८०० कोटी रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. आता मुख्यमंत्री येत आहेतच तर त्यांनी मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या विकासकामांना प्रत्यक्ष सुरूवात करूनच टाकावी, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. सिडकोमुळे विकास शक्य आहे. मग, त्यासाठी १५ वर्षांचा कालावधी का? चारशे कोटींवरून आठशे कोटींवर आलेला प्रकल्प कागदावरच थांबला तर त्याची किंमत दोन हजार कोटींवर पोहोचण्यास वेळ लागणार नाही. पाण्याची समस्याही महत्त्वाचीजगाच्या नकाशावर मेळघाट म्हणजे कुपोषणाचा कलंक लागलेला एक प्रदेश. तेथीलच एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून चिखलदऱ्याची ओळख आहे. वाढती लोकसंख्या व पर्यटकांची संख्या लक्षात घेता येथे मुबलक पाणी नाही. तीन महिने येथील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. गेल्या दहा वर्षांपासून चिखलदरा हे पर्यटनस्थळ तहानलेले आहे. फिल्टर प्लांट नसल्यामुळे पर्यटकांना अशुध्द पाणी प्यावे लागते. पाण्यासाठी नजीकच्या बरमासक्ती येथे मोठा प्रकल्प तयार करण्याचा प्रस्ताव मागील दहा वर्षांपासून तयार आहे. सिडकोमुळे त्याची गती मंदावली आहे. मुख्यमंत्र्यांनी येथील पाण्याची समस्या प्राधान्याने सोडवायला हवी. झुकझुक गाडीचा प्रवासपरतवाडा शहरापर्यंत शकुंतला रेल्वे आहे. तिला नरखेड रेल्वे मार्गाशी जोेडून इकडे चिखलदरा शहरापर्यंत नेल्यास पर्यटकांना रेल्वे मार्ग सोयीचा होऊन घाटवळणाच्या मार्गातून या रेल्वेत बसून फिरण्याचा आल्हाददायी आनंद पर्यटकांना घेता येईल. चौपदरीकरणामुळे होणार विकास नागपूर-इंदूर हा चौपदरीकरणाचा आंतरराज्यीय महामार्ग घोषित झाला आहे. परतवाड्यावरून हा मार्ग घटांग-सेमाडोेह असा जाणार आहे. परंतु तो परतवाडा-चिखलदरा-सेमाडोेह-धारणी असा झाल्यास सर्वाधिक वाहतूक या पर्यटनस्थळावरून होेईल. नागपूर, इंदूर या दोन राज्यांच्या महत्त्वपूर्ण महानगराच्या मधात चिखलदरा पर्यटनस्थळ होणार आहे. ना. नितीन गडकरी यांनी हा मार्ग घोषित केला तेव्हा त्याला चिखलदऱ्यावरून वळविल्यास येथे पर्यटकांची रीघ लागेल, हे येथे उल्लेखनीय.