शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री घेणार १० योजनांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:43 IST

राज्य शासनाच्या १० महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनात लगबग वाढली आहे. या योजनांच्या अंमलबजावणीत माघारलेल्या तीन तालुक्यांतील संबंधित अधिकाºयांना याबाबतची कारणमीमांसा थेट मुख्यमंत्र्यांसमक्ष करावी लागणार आहे.

ठळक मुद्देआज जिल्हा दौरा : माघारलेल्या तीन तालुक्यांची झाडाझडती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाच्या १० महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनात लगबग वाढली आहे. या योजनांच्या अंमलबजावणीत माघारलेल्या तीन तालुक्यांतील संबंधित अधिकाºयांना याबाबतची कारणमीमांसा थेट मुख्यमंत्र्यांसमक्ष करावी लागणार आहे.सर्वसामान्य नागरिकांशी निगडित राज्य शासनाच्या १० महत्त्वाच्या योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रडारवर आहेत. या अनुषंगाने पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक समिती गठित करण्यात आली. या योजनांची फलनिष्पत्ती होण्यासाठी या समितीद्वारे पाठपुरावा करण्यात येणार आहे.तत्पूर्वी, मुख्यमंत्री रविवारी नियोजन भवनात १९ विभागप्रमुखांची बैठक घेणार आहे. मात्र, बैठकीची वेळ निश्चिती उशिरापर्यंत झाली नव्हती. बैठकीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा मुख्यमंत्री घेतील. यात शासन उद्दिष्ट व पूर्ण झालेली घरांची संख्या, प्रधानमंत्री शहरी आवास योजना, नगरोत्थान व अमृत योजना, जलयुक्त शिवार, महानरेगा, धडक सिंचन विहीर, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना व मुद्रा योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, दलितवस्ती सुधार योजना व ठक्करबाप्पा योजना आदींचा आढावा, जिल्ह्यातील व महानगरपालिका क्षेत्रातील दोन वैशिष्ट्यपूर्ण पथदर्शक प्रकल्प, बळीराजा योजना तसेच पंतप्रधान कृषिसिंचन योजनेचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत.कायदा, सुव्यवस्थेसह महापालिकेचाही आढावामुख्यमंत्री रविवारी सकाळी १० वाजता शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांसंदर्भात नियोजन भवनात जिल्ह्याची आढावा बैठक घेतील. दुपारी १२ वाजता महापालिका आढावा बैठक, दुपारी १ वाजता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक घेऊन २.३० वाजता बेलोरा विमानतळाकडे प्रस्थान करणार आहेत.