मुलींनी मारली बाजी : जि. प. हायस्कूलमध्ये कलाम जयंतीनिमित्त भेटधारणी : स्थानिक जि. प. हायस्कूल आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे शनिवारी मिसाईल मॅन भारतरत्न डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी वाचन प्रेरणा दिवस व जागतिक हात धुवा दिवसाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुळकर्णी यांनी भेट देऊन थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांचेशी हितगुज करून संवाद साधला. डॉ. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय? त्यांचा जन्म कुठे झाला? त्यांनी कोणती पुस्तके लिहिलीत? आपण पुस्तक का वाचावेत, असे लहान-सहान प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांचा जणू क्लासच घेतल्याचा अनुभव सर्वांना आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याचे मार्ग दाखवीत विद्यार्थिनींनी त्वरित व समाधानकारक उत्तर दिल्याने कौतुक केले. त्यांच्या उपस्थितीने व विद्यार्थ्यांशी हितगूज साधल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. त्यांनी पुस्तक वाचनाची आवड निर्माण करा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. जागतिक हात धुवा व वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाला मुख्य कार्यपालन अधिकारी कुळकर्णी यांचेसह गटविकास अधिकारी उमेश देशमुख, गट शिक्षणाधिकारी बंडू पटेल, प्राचार्य रमेश नांदुरकर, विस्तार अधिकारी प्रमोद तेलंग, श्यामकांत पाण्डेय उपस्थित होते. याप्रसंगी पाहुण्यांनी डॉ. कलाम व संत गाडग ेबाबांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पोकळे यांनी केले. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)
मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद
By admin | Updated: October 17, 2016 00:22 IST