शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कमरेला पिस्टल दिवाळी पाडव्याच्या दिवशी दादागिरी; एलसीबीने आरोपीला केले जेरबंद

By प्रदीप भाकरे | Updated: November 2, 2024 13:23 IST

दिवाळीच्या दिवशी परतवाडा शहरातील कारवाई.

प्रदीप भाकरे, अमरावती: दिवाळीच्या दिवशी कमरेला देशी बनावटीचे पिस्टल खोचून फिरणाऱ्या एका आरोपीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. चिची उर्फ शेख सादिक शेख सलीम (२०, रा.खिरणी बगीचा, परतवाडा) असे अटक पिस्टलबाजाचे नाव आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस असा एकुण २१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुध्द परतवाडा पोलीस ठाण्यातगुन्हा नोंद करण्यात आला. चिचीविरूध्द जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे नोंद असून तो सराईत गुन्हेगार आहे.

विधानसभा निवडणूक व सणउत्सवाच्या अनुषंगाने जिल्हयात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस स्टेशन यांना विनापरवाना अवैधरित्या शस्त्रे बाळगणा-या इसमांवर विशेष लक्ष ठेवुन त्यांचेकडे असणारे अवैध शस्त्रे जप्त करुन कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने टिम एलसीबी ३१ ऑक्टोबर रोजी परतवाडा हददीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना चिचीबाबत माहिती मिळाली. तो परतवाडा येथील तिरुपती नगर भागात संशयितरित्या वावरतांना दिसला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्टल व काडतुसे दिसून आली. त्याच्याकडे परवाना आढळून न आल्याने त्याच्याविरूध्द परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार अंमलदार युवराज मानमाठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने चालक हर्षद घुसे यांनी ही कारवाई केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात सर्वत्र एलसीबीचे पथक लक्ष ठेऊन आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती