शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

छत्रपती संघटनेने जपले सामाजिक दायित्व

By admin | Updated: March 29, 2016 00:05 IST

कुटुंब प्रमुखाच अवेळी जाण्याने जगाव कसं, अशी घालमेल असतानाच त्यांना जगण्याची नवी उमेद मिळावी ...

तिवसा : कुटुंब प्रमुखाच अवेळी जाण्याने जगाव कसं, अशी घालमेल असतानाच त्यांना जगण्याची नवी उमेद मिळावी या सामाजिक दायित्वातूनच शिव जयंतीच्या पर्वावर आमदार यशोमती ठाकूर मित्रमंडळ व छत्रपती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंतीच्या सोहळ्यात बळीराजांच्या निराधार कुटुंबीयांना उदर निर्वाहाकरिता शिलाई मशीनचे व साडीचोळशीचे वाटप करण्यात आले. शिवजयंती कार्यक्रम म्हणजे शोभायात्रा, घोषणा, जल्लोष अशीच धारणा सर्वांची झाली आहे. मात्र तिवसा येथे शिवजयंतीच्या पर्वावर नुकत्याच पा रपडलेल्या हा भावनिक कार्यक्रम मात्र सामाजिक संदेश देऊन गेला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भैयासाहेब ठाकूर, उद्घाटिका आमदार यशोमती ठाकूर, नगर पंचायत अध्यक्ष राजकन्या खाकसे, उपाध्यक्ष वैभव स. वानखडे, सिने अभिनेता कमलाकर सातपुते, अभिनेता योगेश सुपेकर, शिवव्याख्याते अविनाश धायफुळे पाटील, सुरेशराव साबळे, मुकुंदराव देशमुख, दिलीप काळबांडे, संजय देशमुख, नगर पंचायतचे नगरसेवक, पंचायत समिति सदस्य, सहकार क्षेत्रातील गणमान्य आदि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी शिवचरित्र व्याख्याते अविनाश धायगुडे पाटिल यांनी, आजच्या युवक शेतकरी व समाज कसा असायला हवा यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. शेतकरी आत्महत्याग्रस्त ९ कुटूंबाना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या मध्ये भिवापूर येथील वर्षा जीवन राठोड, केशर चव्हाण, शोभा देवीदास तायडे (अहमदाबाद), उज्ज्वला गोपाल डाहे (दुर्गवाडा), वंदना रमेशराव शेंडे (वाठोडा), प्रतिभा राजेंद्र ढबाले (वाठोडा), ताई शेषराव चव्हाण (भिवापुर, स्वाती अरुणराव ठाकरे (डेहणी) यांचा समावेश होता. यावेळी अपंगांना सायकलीचे वाटप करण्यात आले. सोबतच प्रतिकूल परिस्थितितही स्वबळावर उत्तम शेती करणाऱ्या प्रगतिशील शेतकरी नारायणराव ढांगे (मार्डा), राजेश थोरात (तलेगांव ठाकूर) यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक तिवसा न.प. चे उपाध्यक्ष वैभव वानखडे, संचालन ज्ञानेश्वर घटकर व आभार प्रदर्शन वैभव काकडे यांनी केले. (प्रतिनिधी)