शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चेतन पवार राकाँचे नवे गटनेते

By admin | Updated: April 20, 2016 00:23 IST

प्रभाग क्र.२० चे नगरसेवक तथा माजी उपमहापौर चेतन पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फ्रंटचे नवे गटनेते बनले आहेत.

शिक्कामोर्तब : विभागीय आयुक्तांनी दिले पत्र अमरावती : प्रभाग क्र.२० चे नगरसेवक तथा माजी उपमहापौर चेतन पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फ्रंटचे नवे गटनेते बनले आहेत. १८ एप्रिलला विभागीय आयुक्तांनी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. ते महापालिकेतील २५ सदस्यीय राकाँ फ्रंटचे नेतृत्व करतील. मावळते गटनेते अविनाश मार्डीकरांची स्थायी समिती सभापती पदी वर्णी लागल्याने नवा गटनेता कोण? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे पवार यांचीच या पदावर नियुक्ती झाली. मार्डीकरांनी स्थायी सभापती म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर गाडी, केबीन आणि अधिकाराचे हे पद आपल्या पदरात पडावे, यासाठी काही इच्छुकांनी पक्षप्रमुखांकडे रदबदली चालविली होती. मात्र, २५ नगरसेवकांच्या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी राकाँ फ्रंटचे नेते संजय खोडके यांनी त्यांच्या विश्वासातील व्यक्तिवर टाकली आहे. राकाँफ्रंटच्या गटनेतेपदासाठी चेतन दशरथराव पवार यांचे नाव घेण्याबाबत मार्डीकरांनी मागील २ एप्रिलला विभागीय आयुक्तांना पत्र लिहिले. ते पत्र विभागीय आयुक्तांकडे १३ एप्रिलला पोहोचले. त्यावर १८ एप्रिलला निर्णय घेण्यात आला. प्रवीण मेश्राम, सारिका महल्ले, निलिमा काळे, विजय बाभुळकर, सपना ठाकूर, आशा निंधाने, चेतन पवार, जयश्री मोरय्या, नंदकिशोर वऱ्हाडे, मिलिंद बांबल, ममता आवारे, अविनाश मार्डीकर, वंदना हरणे, सुनील काळे, चरणजितकौर नंदा, जावेद मजीद मेमन, जयश्री मोरे, भूषण बनसोड, शेख हमीद शेख शद्दा, बिल्किस बानो, रहिमाबी, मो. इमरान, मो.याकूब, अंबादास जावरे, दिनेश बुब, हमीदाबानो शेख अजफल यांचा राकाँ फ्रंटमध्ये समावेश आहे. (प्रतिनिधी)