शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त तपासणार खर्चाची सत्यता

By admin | Updated: February 5, 2017 00:04 IST

महापालिकांची सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी दाखल केलेल्या खर्चाची सत्यता तपासण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाचे आदेश : खर्चाचा हिशेब न दिल्यास फौजदारीअमरावती : महापालिकांची सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी दाखल केलेल्या खर्चाची सत्यता तपासण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ते अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे राहणार आहेत. निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली असून खर्चाचा हिशेब सादर न करणाऱ्या किंवा सीमा ओलांडणाऱ्या उमेदवारांविरुद्ध फौजदारी गुन्ह्यासह कारवाई करण्याची तरतूद राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. २१ फेब्रुवारी रोजी राज्यातील १० महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्याने खर्चावरील मर्यादेत सुधारणा करण्यात आली आहे. उमेदवारांनी खर्चाचा हिशेब दरदिवशी सादर करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्याची तरतूद आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ३० दिवसांच्या आत एकूण खर्चाचा हिशेब व त्यासोबत निवडणुकीवर झालेल्या सर्व खर्चाचा हिशेब व तपशील देण्यात आलेला आहे आणि कोणताही खर्च लपविण्यात आलेला नाही. या आशयाचे शपथपत्र प्रत्येक उमेदवाराने देण्याची तरतूद आहे. जर जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्त यांनी मागणी केली, तर उमेदवाराने खर्चाच्या हिशेबाची पुस्तके, बिले, व्हाऊचर इत्यादी तपासण्याकरिता देणे आवश्यक आहे.निवडणुकीमध्ये अवाजवी खर्च तसेच अवैध मार्गाने मतदारांना प्रभावित करण्यासाठी किंवा प्रलोभन देण्यासाठी राजकीय पक्ष व उमेदवारांकडून वापरण्यात येणाऱ्या नवनवीन योजनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये चिंता व्यक्त करून त्यांच्यावर आळा बसविण्यासाठी अनेक अभिप्राय दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना निवडणूक खर्चाचा हिशोब देण्यासाठी वेळ आणि रीत निश्चित करून दिले आहेत. (प्रतिनिधी)