शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर अश्लील फोटो पाठवून पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:14 IST

चांदूर रेल्वे (अमरावती) : मोबाईलवर अश्लील फोटो पाठवून व पाठलाग करून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना चांदूर रेल्वे ...

चांदूर रेल्वे (अमरावती) : मोबाईलवर अश्लील फोटो पाठवून व पाठलाग करून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी मध्य प्रदेश व अकोला जिल्ह्यातून तीन आरोपींना अटक केली आहे. विजय मोहन डाबेराव (२१), रंजित रणसिंह पवार (१९, दोघेही रा. टाकळी पोटे, जि. अकोला) व १९ वर्षीय महिला (रा. नवेगाव, जि. बालाघाट, मध्यप्रदेश) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

एका १५ वर्षीय पीडिताला ओळखीचे दोन इसम व एक महिला यांनी वारंवार फोन करून तिला फोनवर बोलण्यास बाध्य करीत होते. परंतु, फिर्यादीने नकार दिला. सदर आरोपींनी पीडिताच्या एका मैत्रिणीला फोन करून तिला बोलण्यास सांगितले. नाही बोलली, तर जिवाने मारून टाकू, अशी धमकी दिली. पीडिताच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एका आरोपी महिलेने तिचे अश्लील छायाचित्र पाठवून लज्जास्पद वाटेल असे कृत्य केले. याशिवाय आरोपींनी पीडिताच्या गावात जाऊन सतत पाठलाग केला व तिला फोन केले. अशा तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३५४ ड, ५०६, ३४, सहकलम ११, पोक्सो सहकलम ६७, ६७ अ, माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून घेतला.

चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते यांनी उपनिरीक्षक गणेश मुपडे, कर्मचारी गजानन ठाकरे, महेश प्रसाद व महिला पोलीस प्रिया हिरेखन यांच्या पथकाला आरोपींच्या शोधात रवाना केले. या पथकाने प्रथम अकोला जिल्ह्यातील टाकळी पोटे येथून आरोपी विजय डाबेराव व रंजित रणसिंह पवार यांना अटक केली. यानंतर मध्य प्रदेशमधील नवेगाव येथून १९ वर्षीय महिला आरोपीला अटक केली.

-------