शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरड्याच्या हत्येला नरबळीची किनार !

By admin | Updated: February 28, 2017 00:04 IST

निर्दयी पित्याने पत्नीच्या पहिल्या पतीपासून प्राप्त झालेल्या मुलाची निर्घृ$ण हत्या केल्याची घटना १७ फे्रब्रुवारी रोजी अकोट येथे उघड झाली.

मृताच्या आईने व्यक्त केली शंका : सीबीआय चौकशीची मागणीअमरावती : निर्दयी पित्याने पत्नीच्या पहिल्या पतीपासून प्राप्त झालेल्या मुलाची निर्घृ$ण हत्या केल्याची घटना १७ फे्रब्रुवारी रोजी अकोट येथे उघड झाली. या हत्याकांडात फे्रजरपुरा पोलिसांनी रमनचे सावत्र वडील मंगेश नामदेव दांडगे (रा. लुंबिनीनगर) याला अटक केली. मात्र, हत्येपूर्वी रमन दांडगेला कुठे डांबून ठेवण्यात आले, या हत्येत आणखी कोणी मदत केली का, त्याचे साथीदार कोण, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. तसेच रमनची हत्या ही नरबळीचा प्रकार नाही ना, अशी शंकाही त्याच्या आईने व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रमनच्या आई प्रज्ञा दांडगे यांनी मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्याकडे निवेदन सादर करून केली आहे. आठ वर्षीय रमन दांडगे हा ९ फेब्रुवारी रोजी शाळेत गेल्यानंतर तो सायंकाळपर्यंत घरी परतला नव्हता. त्यामुळे त्याची आई प्रज्ञा दांडगे यांनी फे्रजरपुरा पोलीस ठाणे गाठून रमनचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली. याप्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी रमनचे सावत्र वडील मंगेश दांगडे यांची चौकशी सुरू केल्यानंतर त्यानेच रमनच्या हत्येची कबुली दिली. रमनला शाळेतून घेऊन गेल्यावर मंगेश दांडगेने त्याला अकोट येथील वाई गावात नेले. तेथील जंगलाच्या भागात नेऊन रमनची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह पेट्रोल जाळून टाकला. या प्रकरणात पोलिसांनी मंंगेश दांडगेविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवूून त्याला अटक केली. फे्रजरपुरा पोलिसांनी आरोपी मंगेश दांडगेला वाई गावातील घटनास्थळी नेले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन केला. दरम्यान पोलिसांनी मंगेश दांडगेची पोलीस कोठडीत चौकशी करून त्याच्याजवळून गुन्ह्यात वापरेले साहित्य व दुचाकी जप्त केली. या घटनेमुळे जिल्ह्याभरात खळबळ उडाली. मंगेश दांडगेची पहिली पत्नी सोडून गेल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले होते. दुसऱ्या पत्नीजवळ पहिल्या पतीचा मुलगा होता. काही दिवस संसारिक जीवनात घालविल्यानंतर मंगेश व त्यांच्या पत्नीत वाद होऊ लागले. कौटुंबिक वादानंतर मंगेशने रमनचे अपहरण केले. पत्नीच्या रागावर मंगेशने चिमुरड्या रमनचीच हत्या करून त्याचा मृतदेह जाळून टाकला. मात्र, मंगेश व त्याची पत्नीत वाद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवून मंगेशची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. हत्येपूर्वी रमनचे सावत्र वडील मंगेश दांडगे हा त्याची पत्नी प्रज्ञा दांडगेसोबत गुप्तधनाबद्दल चर्चा करीत होता. त्यामुळे मंगेश दांडगे याने रमनसारख्या अन्य बालकांचादेखील नरबळी दिला असावा, रमनची हत्या ही नरबळीचा प्रकार तर नाही, अशी शंका रमनच्या आईने व्यक्त केली आहे. या हत्येत मंगेशच्या आणखी काही साथीदारांचा सहभाग असू शकतो, त्यामुळे रमनच्या हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रज्ञा दांडगे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्यासह मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. (प्रतिनिधी)