शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाविरोधात खरवाडी येथे चक्काजाम

By admin | Updated: June 3, 2014 23:45 IST

तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी विद्युत वितरण कंपनीच्या १६ तासांच्या भारनियमनाला कंटाळून अखेर खरवाडी रस्त्यावर मंगळवारी सकाळी चक्काजाम आंदोलन केले.

चांदूरबाजार : तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी विद्युत वितरण कंपनीच्या १६ तासांच्या भारनियमनाला कंटाळून अखेर खरवाडी  रस्त्यावर मंगळवारी सकाळी चक्काजाम आंदोलन केले.स्थानिक वीज कंपनीच्या हद्दीत येणार्‍या कुरळपुर्णा, तळवेल, बेलोरा या फिडरवरील सिंगल फेजचा विद्युत पुरवठा असलेल्या गावांमध्ये भारनियमनाचे प्रमाण मार्यादेपेक्षा वाढले आहे. याबाबत  गावातील नागरिकांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या. परंतु तक्रारीचा वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना चक्काजाम आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहीला नव्हता.भारनियमनाविरोधात नागरिकांमध्ये वीज कंपनी विरोधात रोष खदखदत होता. लोडशेडिंगमुळे गावातील लघुउद्योग संकटात आले होते. विद्यार्थ्यांनाही अभ्यास करतांना त्रास सहन करावा लागत होता.  सततचे भारनियमन बंद करुन गावठाण फीडरची सुविधा करण्याबाबतही नागरिकांनी पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहाराला वीज कंपनीने नेहमीच केराची टोपली दाखविली. त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेऊन चक्काजाम आंदोलनाचा पवित्रा घेतला.  नियमानुसार सिंगल फेज फिडरमध्ये गावातील विद्युत पुरवठा २४ तास सुरू असणे आवश्यक आहे. परंतु या सिंगल फेजच्या नावावर ग्रामीण भागात १६ तासांचे भारनियमन होत आहे. अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुरेखा ठाकरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज चक्काजाम आंदोलन केले. दरम्यान, मुख्य अभियंता संजय ताकसांडे यांच्याशी आंदोलनकर्त्यांच्या चर्चेनुसार मनमानीपणे वीज ग्राहकांना देण्यात आलेली वीज देयके त्वरित दुरुस्त करण्यासंदर्भात विशेष शिबिर घेऊन याबाबत कारवाई केली जाईल.  जिल्ह्याला सोफीया वीज प्रकल्पातून मोफत वीज पुरवठा देण्यात यावा यावर चर्चा करण्यात आली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत १0 जूनपर्यंंत निर्णय न झाल्यास कुठलीही वीज देयके नागरिक भरणार नाही असा इशारा यावेळी सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वातून शिष्टमंडळाने वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांना दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडुपंत ठाकरे, प्रवीण भुजाडे, निखील ठाकरे, अनिस अहमद, दिलीप अंभोरे, दिलीप मेश्राम, संजय बावनथडे, बाळासाहेब विधळे, राजेश अढाव, रवींद्र काळे आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)