शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारी शिक्षकाला न्यायालय परिसरात चोप

By admin | Updated: September 17, 2016 00:17 IST

मूकबधिर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला खोलापुरी गेट पोलिसांनी गुरूवारी रात्री अटक केली आहे.

खोलापुरी गेट परिसरातील घटना : आरोपीला एक दिवसाची कोठडीअमरावती : मूकबधिर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला खोलापुरी गेट पोलिसांनी गुरूवारी रात्री अटक केली आहे. दीपक भाऊराव उघडे (४४,रा.पोटे टाऊनशिप) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात आणले असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांसह काही संतप्त नागरिकांनी आरोपीला न्यायालयात परिसरातच चोप दिला.खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील मूकबधिर मुला-मुलींच्या शाळेत शिकणारी एक सातवर्षीय विद्यार्थिनी गुरूवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेली. गणेश विसर्जनामुुळे शाळेत दोन ते तीनच विद्यार्थी उपस्थित होते. शाळेत शुकशुकाट असल्याची संधी हेरून आरोपी दीपकने त्या विद्यार्थिनीला प्रसाधनगृहात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. विद्यार्थिनीने घरी जाऊन ही बाब सांकेतिक भाषेत आईला सांगितली. त्यांनी तत्काळ खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठून आरोपी शिक्षक दीपक उघडेविरूद्ध तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३७६ (क), पॉक्सो ८, १०, १२ नुुसार गुन्हा नोंदविला. प्रकरणाचे गांभीर्य बघता पोलिसांनी तत्काळ पोटे टाऊनशिपमध्ये जाऊन आरोपी शिक्षकाला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्याकरिता आणण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष बद्रे, प्रवीण डांगे, संजय गव्हारे, धीरज आठवले, बच्चू रेडे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त करीत आरोपीला चोप दिला. या घटनेमुळे न्यायालयात परिसरात गोंधळ उडाला होता. पोलिसांनी तणावाची स्थिती हाताळत आरोपीला न्यायालयात हजर केले आणि चोख बंदोबस्तात परत ठाण्यात नेले. (प्रतिनिधी)