शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे कंत्राटदारांच्या नफेखोरीला बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 22:51 IST

शासनाच्या विविध विभागांत कामे करणाºया कंत्राटदारांना आता १ जुलैपासून जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू झाल्याचे शासनाने परिपत्रक निघताच कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देशासनाचे आदेश धडकलेत : विकासकामे प्रभावित होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाच्या विविध विभागांत कामे करणाºया कंत्राटदारांना आता १ जुलैपासून जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू झाल्याचे शासनाने परिपत्रक निघताच कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे. तब्बल १८ टक्के जीएसटी भरावा लागत असल्याने कंत्राटदारांच्या नफेखोरीला चाप बसणार आहे.शासनाची बहुतांश कामे ही कंत्राटदारांमार्फत होत असतात. कामाच्या निविदा विविध विभागांमार्फत काढल्या जातात. पात्र कंत्राटदार या निविदा जास्त किंवा कमी दराने भरतात या निविदांमध्ये कंत्राटदारांचा संभाव्य नफाही ठरलेला असतो.यापूर्वी कंत्राटदाराला पडणारा आयकर असे व्हॅट याचीही गणना करून निविदेची किंमत ठरविली जात असे. त्यामुळे कंत्राटदारांना निव्वळ नफा शिल्लक राहण्याची हमी होती. म्हणून कित्येक कंत्राटदार निविदेपेक्षा कमी दरात कंत्राट घेत होते. परंतु, आता १ जुलैपासून शासनाने शासकीय कंत्राटदराच्या रकमेवर १८ टक्के जीएसटी लागू होत असल्याने या कराच्या बोझाचा विचार करूनच निविदा सादर करण्याबाबत स्पष्ट निर्देश कंत्राटदारांना द्यावे, असेही शासनाच्या या परिपत्रकात सुचविण्यात आले आहे.ज्या निविदा २२ आॅगस्टपूर्वी स्वीकारण्यात आल्या आहेत. परंतु, त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले नाहीत. अशा निविदा रद्द करण्यात याव्या व पुनश्च देऊन निविदा प्रक्रिया करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे, तर १ जुलै २०१७ नंतरच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असेल, तर ते कंत्राट रद्द करण्यात येऊ नये, असे शासकीय आदेशात म्हटले आहे.१ जुलैपूर्वी झालेल्या कामांना जीएसटी नाही१ जुलैपूर्वी झालेली कामे व प्राप्त झालेल्या देयकावर पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे व्हॅट आकारण्यात यावा, व्हॅट व टीडीएसची रक्कम वजा करून त्याचा भरणा शासकीय तिजोरीत करण्यात यावा, असेही शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांनी यावर बैठक घेवून चर्चा केल्याचे समजते. अनेक कंत्राटदारांला यापुढे शासनाची कामे करावी की नाही, या द्विधा मन:स्थितीत दिसत आहेत.