शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

समलैंगिक संबंध ठेवणा-या'त्या'डॉक्टरविरुद्ध फसवणुकीचाही गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 17:40 IST

पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवणा-या 'त्या'डेंन्टीस पतीविरुद्ध सायबर पोलिसांनी मंगळवारी फसवणुकीचाही गुन्हा दाखल केला

 अमरावती - पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवणा-या 'त्या'डेंन्टीस पतीविरुद्ध सायबर पोलिसांनी मंगळवारी फसवणुकीचाही गुन्हा दाखल केला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाने सायबर पोलिसांनी तपास करून निरीक्षण नोंदविल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली.    पोलीस सूत्रानुसार, ५ एप्रिल २०१८ रोजी पीडित पत्नीने कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानंतर तपास सायबर सेलकडे सोपविला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने आरोपी पतीला जामीन दिला. काही दिवसांनंतर आरोपी पतीने एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याचा तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाने पीडित महिलेच्या जुन्या न्यायालयीन प्रकरणे लक्षात घेता आरोपी पतीने पत्नीची फसवणूक केल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. त्यासंबंधाने गुन्हा नोंदविला जाऊ शकतो, त्यासंबंधित चौकशी करून गुन्हा नोंदविण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने सायबर पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी आठ दिवसांच्या  सखोल चौकशीअंती आरोपी पतीविरुद्ध भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदविला.

काय आहे प्रकरण?तक्रारकर्ता पत्नी व आरोपी पती हे दोघेही दंत तज्ज्ञ लग्नाच्या काही दिवसांनंतरच पतीला लैंगिक संबंधाविषयी आकर्षण नसल्याचे पत्नीच्या लक्षात आले. पतीची वागणूक बदलली कशी, तो शारीरिक व मानसिक त्रास का देत आहे, याविषयी पत्नीला संशय बळावल्याने तिने पतीचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यावेळी पतीचे एका पुरुषासोबत लैंगिक संबंध असल्याचे पत्नीच्या निदर्शनास आले. एकेदिवशी तिने पती दवाखान्यात नसताना छोटासा छुपा कॅमेरा बसविला. त्या कॅमेºयात पती एका पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवत असल्याचे तिला दिसले. पतीच्या या कृत्याचा १८ वर्षांनंतर पदार्फाश झाला. तिने छुप्या कॅमेºयात झालेले चित्रिकरण पुरावा म्हणून पोलीसासमक्ष ठेवला आणि पतीविरुद्ध तक्रार नोंदविली. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध भादंविच्या कलम ३७७, ४०६, ४९८(अ) अन्वये गुन्हा नोंदविला. 

त्या डॉक्टरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले. त्यानुसार तपास करून फसवणुकीच्या गुन्ह्याची कलम वाढविण्यात आली आहे.   - कांचन पांडे, सहायक पोलीस निरीक्षक

टॅग्स :Courtन्यायालयAmravatiअमरावती