शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रातील अनागोंदी चव्हाट्यावर

By admin | Updated: July 10, 2017 00:09 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी मेळघाटासह अचलपूर तालुक्यात मागील दोन दिवसांत केलेल्या ...

झेडपी अध्यक्षांचा दौरा : आकस्मिक भेटीत प्रशासनाची पोलखोललोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी मेळघाटासह अचलपूर तालुक्यात मागील दोन दिवसांत केलेल्या आकस्मिक दौऱ्यात जि.प.आरोग्य केंद्र व शाळांमधील अनागोेंदी चव्हाट्यावर आली. यागैरकारभारासाठी जबाबदार कर्मचारी, अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश झेडपी अध्यक्षांनी दिले आहेत. या दौऱ्याच्यावेळी डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे हे देखील उपस्थित होते.अध्यक्षांच्या दौऱ्याचा पहिला टप्पा अचलपूर पंचायत समितीमधून सुरू झाला. त्यांनी बांधकाम उपविभागाला भेट देऊन येथील दस्तऐवजांची तपासणी केली. यावेळी कनिष्ठ अभियंता दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या दौऱ्यांची रजिस्टरमध्ये कुठलीही नोंद नव्हती. पंस.मधील विस्तार अधिकारी सुद्धा चमक येथे दौऱ्यावर गेल्याचे अध्यक्षांना सांगण्यात आले. मात्र, शहानिशा केली असता ते कर्तव्यावरच नसल्याचे उघड झाले. यानंतर अध्यक्षांनी चिखलदरा पंचायत समिती कार्यक्षेत्रातील बिहाली आणि धारणी तालुक्यातील टिंटबा, मोगर्दा येथील जि.प.शाळांना भेटी देऊन पोषण आहाराची तपासणी केली. त्यांनी मोगर्दा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला भेट दिली असता याठिकाणी प्रशासकीय कामकाजात बऱ्याच उणिवा दिसून आल्यात. पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजाची माहिती घेऊन त्यांनी जिल्हा परिषद हायस्कूल तसेच मेळघाटातील पुलांच्या कामाची पाहणी सुद्धा केली. आरोग्य यंत्रणेचा बोजवाराजिल्हा परिषद अध्यक्षांनी मोगर्दा येथील आरोग्य उपकेंद्र तसेच आयुर्वेदिक दवाखान्याला दिलेल्या भेटीत वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर दवाखान्याला कुलूप होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा खरा चेहरा समोर आला आहे.