शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या प्रक्रियेत बदल

By admin | Updated: July 14, 2014 23:43 IST

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची लोकवर्गणीची अट रद्द करण्यात आली असून मंजुरीच्या अधिकारातही शासनाने बदल केला आहे़ कार्यकारी अभियंत्यांना आता दोन कोटी रूपयांपर्यंत तांत्रिक मान्यतेचे अधिकार दिले आहेत़

मोहन राऊत - अमरावतीग्रामीण पाणीपुरवठा योजनांची लोकवर्गणीची अट रद्द करण्यात आली असून मंजुरीच्या अधिकारातही शासनाने बदल केला आहे़ कार्यकारी अभियंत्यांना आता दोन कोटी रूपयांपर्यंत तांत्रिक मान्यतेचे अधिकार दिले आहेत़मागील १४ वर्षांपासून गावस्तरावर पाणीपुरवठा योजने संदर्भात अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या़ या समित्यांना विशेष अधिकार देण्यात आल्यामुळे गावातील पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्याऐवजी संथ गतीने या योजनेचे कामकाज चालत होते़ आता शासनाने या योजनेत बदल केला आहे़ नवीन धोरणानुसार, १० टक्के लोकवर्गणीची अट रद्द करण्यात आली आहे़ यापूर्वी ही लोकवर्गणी संबंधित योजनेचा कंत्राटदार भरून गावातील कामे करीत असे. विशेषत: अनेक गावांत समितीचे पदाधिकारी लोकवर्गणी भरून ही टक्केवारीचे कामे करीत असल्याच्या अनेक तक्रारी राज्याच्या ग्रामीण पाणीपुरवठा खात्याकडे गेल्या होत्या. त्यामुळे लोकवर्गणीची अट रद्द करण्यात आली आहे़ गावातील पाणीपुरवठा योजना मंजूर करताना कार्यकारी अभियंत्यांना दोन कोटींपर्यंतच्या योजनेच्या तांत्रिक मान्यतेचे अधिकार देण्यात आले आहे़ विशेषत: २ कोटी ते ७ कोटी ५० लाखापर्यंत तांत्रिक मंजुरी देण्याचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले आहे़ तांत्रीक मान्यतेप्रमाणेच प्रशासकीय मान्यतेच्या अधिकारातही बदल करण्यात आला आहे़५० लाखापर्यंतची योजना मंजूर करण्याचे अधिकार ग्रामसभेला दिले आहेत़ तर ५० लाख ते ७ कोटी ५० लाख पर्यंतची योजना मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा व्यवस्थापन समितीला तसेच ७ कोटी ५० लाखावरील योजना मंजूर करण्याचे अधिकार शासनाला देण्यात आले आहे़ परंतु दोन कोटी रुपयांपर्यंतच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला दिल्याबद्दल गावातून नाराजीचा सूर उमटत आल्याचे दिसत आहे़ २ कोटी ते ७ कोटी ५० लाख रुपयांपर्यंतच्या अंमलबजावणीचे अधिकार जिल्हा परिषदेला तर ७ कोटी ५० लाखांवरील योजनेच्या अंमलबजावणीचे अधिकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आले आहे़