शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीच्या काम वाटपात 'सुबे'ला विनास्पर्धा कामे धोरण बदलले; समिती रचना व कार्यपद्धतीत बदल

By जितेंद्र दखने | Updated: June 10, 2023 19:19 IST

जिल्हा परिषदेमार्फत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना काम वाटपाची लॉटरी लागणार आहे.

अमरावती : जिल्हा परिषदेमार्फत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना काम वाटपाची लॉटरी लागणार आहे. विशेष म्हणजे शासनाच्या नव्या अध्यादेशानुसर पाच लाखांपर्यंत विविध प्रकारची १० विशिष्ट कामे ही केवळ सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. शिवाय उर्वरित १५ लाखांपर्यंतच्या कामातही सुशिक्षित बेराजेगारांना ४० टक्के कामे मिळणार आहेत. त्यामुळे नवीन धोरणानुसार काम वाटपात सुबेअला दिलासा मिळणार आहे. नवीन धोरणानुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना पाच लाखांपर्यंतची विशिष्ट प्रकारची १० कामे तसेच ५-१५ लाखांपर्यंतच्या एकूण कामापैकी ४० टक्के कामांवर सुशिक्षित बेरोजगार अर्थात सुशिक्षित बेराेजगार अभियंत्याचा अधिकार राहणार आहे. परिणामी पाच लाखांखालील कामे ही मजूर व सर्वसाधारणला मिळणारच नाहीत. त्यामुळे उर्वरित पाच लाखांपुढे ते १५ लाखांपर्यंतची २३ कामे ही मजूर संस्थांना तर सर्व साधारण अभियंत्यांना अशी ३९ कामे दिली जाणार आहेत.

याप्रकारची मिळणार विशिष्ट कामेसुशिक्षित बेरोजगारांना मिळणाऱ्या नवीन गाइडलाइननुसार नोंदणीकृत कंत्राटदारांना ५ लाख किमतीपर्यंतची विशिष्ट कामे आरक्षित केले आहेत. त्यात वाहतुकीचे कामे, कूपनलिका खोदणे, विशेष स्वरूपाची आर.सी.सी. कामे, पेस्ट कंट्रोल अथवा प्रतिबंधक कामे, हॉट मिक्स प्लॅन्ट आणि पेव्हर फिनिशरची कामे यासह अन्य पाच प्रमुख कामांचा समावेश आहे. यापूर्वीची अशी होती पध्दत!यापूर्वी ६२०० ते १० लाखांपर्यंतच्या कामांचे झेडपीतून वाटप केले जात होते. यामध्ये सुशिक्षित बेरोजगार, मजूर संस्था आणि सर्वसाधारण यांना ३३-३३-३४ या फॉर्मूल्याने कामांचे वाटप केले जात होते. मात्र आता यामध्ये नव्या आदेशानुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना प्राधान्य मिळणार आहे. तर मजूर संस्था व सर्वसाधारणची काहीशी कोंडी झाल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या कामवाटपात पाच लाखांपर्यंतची विशिष्ट कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दिली जाणार आहे. उर्वरित कामांमधूनही ४० कामांसाठी त्यांना प्राधान्य राहणार आहे. ही कामे काम वाटप समितीच्या माध्यमातून विना स्पर्धा लॉटरी पध्दतीने वितरीत होतील. दिनेश गायकवाड, कार्यकारी अभियंता बांधकाम 

टॅग्स :Amravatiअमरावती