शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरच्या १७ बाजार समिती संचालकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:07 IST

येथील बाजार समितीच्या आवारातून अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आल्यानंतर बुधवारी अचानक झालेल्या घडामोडीत १७ संचालकांना चौकशीकरिता बोलावून पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी एकूण २१ संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजनावरांचे अवैध वाहतूक प्रकरण : २१ संचालकांवर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : येथील बाजार समितीच्या आवारातून अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आल्यानंतर बुधवारी अचानक झालेल्या घडामोडीत १७ संचालकांना चौकशीकरिता बोलावून पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी एकूण २१ संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.स्थानिक बाजार समितीच्या आवारातील अवैध जनावरांचे वाहतूक प्रकरण ११ जून रोजी उघडकीस आले होते. या प्रकरणात पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू होती. पहिल्याच दिवशी सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर सचिवांवरही कारवाई झाली. बुधवार, २७ जून रोजी संचालक मंडळाची पुन्हा चौकशी करण्यात आली. ही चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केली. त्यानंतर बाजार समितीच्या २१ संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैकी १७ संचालकांना तातडीने अटक करण्यात आली आहे.एसडीपीओ जयंत मिणा यांनी सर्व संचालकांना सकाळी ९ वाजता स्थानिक पोलीस ठाण्यात चौकशीकरिता हजर राहण्यास सांगितले होते. मिणा यांनी स्वत: दोन तास कसून चौकशी केली. त्यानंतर बाजार समितीच्या सर्व संचालकांवर गुन्हे दाखल करून, पुढील कारवाईचे निर्देश ठाणेदारांना देण्यात आले. ठाणेदारांनी संचालकांविरुद्ध भादंविचे कलम ४२० ब, ४६५, ४६८, ३४ व सहकलम ५ अ, ११ ई व ड अन्वये गुन्हे दाखल केले. त्यानंतर दीडच्या सुमारास १७ संचालकांना तातडीने अटक करण्यात आली. चौकशीकरिता बोलावलेल्या इतर संचालकांना अटकेतून सूट देण्यात आली.जनावरांच्या अवैध वाहतुकीच्या प्रकरणात संचालकांना अटक होण्याची घटना राज्यात एकमेव चांदूर बाजार येथील बाजार समितीत घडली आहे. बुधवारी अटक करण्यात आलेल्या संचालकांमध्ये बबलू देशमुख गटाचे सभापती प्रवीण वाघमारे, उपसभापती कांतीलाल सावरकर, अरविंद लंगोटे, मनोज नांगलिया, अमोल लंगोटे, प्रमोद घुलक्षे, नंदकिशोर वासनकर, हरिभाऊ बोंडे, विलास शेकार, सतीश धोंडे तसेच प्रहारचे मंगेश देशमुख, विनोद जवंजाळ, सुभाष मेश्राम, सत्तारखाँसह तज्ज्ञ संचालक विलास तायवाडे, सतीश मोहड, पणन महासंघाने नियुक्त केलेले संचालक सुरेश विधाते यांचा समावेश आहे.पोलीस ठाण्यापुढे गर्दीसंचालक मंडळाला अटक झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने शहरात पसरली. त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी पोलीस ठाण्यापुढे झाली होती. अटक करूनही त्यांना कार्यालयीन वेळेपर्यंत न्यायालयात हजर न केल्याने या कारवाईबाबत नागरिकांमध्ये निरनिराळ्या चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण आले होते.प्रकरणात केवळ चौकीदार दोषी नसून, संचालक मंडळही दोषी असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.- अजय आकरे, ठाणेदार