शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर तहसीलची झाडाझडती

By admin | Updated: June 4, 2014 23:21 IST

जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी चांदूरबाजार तहसील कार्यालयाला बुधवारी सकाळी ११.३0 वाजता अचानक भेट दिली. गारपीटग्रस्तांचे अनुदान शेतकर्‍यांच्या बॅंक खात्यात अद्याप जमा झाले नसल्याचे

चांदूरबाजार: जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी चांदूरबाजार तहसील कार्यालयाला बुधवारी सकाळी ११.३0 वाजता अचानक भेट दिली. गारपीटग्रस्तांचे अनुदान शेतकर्‍यांच्या बॅंक खात्यात अद्याप जमा झाले नसल्याचे पाहून ते अवाक झाले. त्यांनी लगेच बँक अधिकार्‍यांची बैठक घेऊन अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी सर्वप्रथम तहसील कार्यालयामधील पुरवठा विभागाला भेट देऊन अन्नसुरक्षा योजनेतील धान्य वाटपाची चौकशी केली. या विभागात सध्या प्रभारी पुरवठा निरीक्षकांच्या सोबतीला केवळ एक महिला सहाय्यक लिपिक आहे. वास्तविक पुरवठा विभागात दोन कर्मचारी आवश्यक असताना पुरवठा निरीक्षकांची बदली झाल्यानंतरही येथे कोणतीच नियुक्ती करण्यात आली नाही. या विभागात कार्यरत पुरवठा निरीक्षकांकडे प्रभारी पुरवठा अधिकार्‍याचा कारभार आहे. ही बाब सुध्दा जिल्हाधिकार्‍यांच्या लक्षात आणून देण्यात आली.याशिवाय शेतकर्‍यांच्या नोंदी, फेरफार, त्यांना मिळणार्‍या संगणकीय ७/१२ विषयीच्या समस्या जिल्हाधिकार्‍यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी तालुक्यातील शेतकर्‍यांना अनुदान वितरण करणार्‍या बँक व्यवस्थापकांची बैठक बोलावली.  यात तालुक्यातील १६ बँक व्यवस्थापकांना बैठकीत सहभागी होण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यातील एसबीआय, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक उपस्थित होते. यावेळी प्रथमच येथून १८ किमीवर अंतरावर असलेल्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमार्फत गारपिटीचे अनुदान देण्याबाबत तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले. या संबंधीचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी प्रभारी तहसीलदारांना दिले. रिक्तपदाची समस्या लवकरच सोडविण्याचे आश्‍वासन यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी उपस्थित पत्रकारांना दिले. जिल्हाधिकार्‍यांनी घेतलेल्या झाडाझडतीची बरीच चर्चा होती.