शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर रेल्वेत पहिलवानांची वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 01:26 IST

येथील जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळाच्यावतीने स्थानिक अशोक महाविद्यालयाच्या मैदानावर दोन दिवसीय कुस्ती सामन्यांना शनिवारी थाटात प्रारंभ झाला. अवघे शहर कुस्तीमय झाल्याचे सुखद चित्र आहे. जय हिंद क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्देकुस्ती स्पर्धेला प्रारंभ : वाजत-गाजत मिरवणूक

चांदूर रेल्वे : येथील जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळाच्यावतीने स्थानिक अशोक महाविद्यालयाच्या मैदानावर दोन दिवसीय कुस्ती सामन्यांना शनिवारी थाटात प्रारंभ झाला. अवघे शहर कुस्तीमय झाल्याचे सुखद चित्र आहे. जय हिंद क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे.शनिवार २३ फेब्रुवारी रोजी दुपारी शहरात आलेल्या कुस्तीवीरांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई, पुणे, अहमदनगर, नागपूर यासोबत अनेक शहरातून कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शहरात आले आहेत. तुर्तास आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू तेजस्विनी दहिकर, अनिल तोडकर, राज्यस्तरीय विजेते खेळाडू गूलाब आगरकर यांच्यासह हरियाणाचे हिंदकेसरी युद्धविर व दिल्लीचे प्रवीण भोला दाखल झाले आहेत.कुस्ती स्पर्धेचे उदघाटक म्हणून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य तर प्रमुख पाहूणे म्हणून विशेष पोलिस महानिरिक्षक श्रीकांत तरवडे, प्रसिद्ध उद्योगपती दिलीप गिरासे, निलेश विश्वकर्मा, विदर्भ केसरी संजय तिरथकर आदींची उपस्थिती होती. संपूर्ण शहरात कुस्ती पाहण्यासाठी तरुण तसेच क्रीडा प्रेमींची गर्दी उसळली आहे.