शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्ट साखळीला ‘ब्रेक’ लावण्याचे आव्हान !

By admin | Updated: February 20, 2017 00:04 IST

ऐन निवडणुकीच्या काळात बदल्यांचे आदेश काढत महापालिका आयुक्तांनी निवडक कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय दंडुका उगारण्याचे धाडस दाखविले आहे.

महापालिका आयुक्तांचा लक्ष्यवेध : आदेश न पाळणाऱ्यांविरूद्ध होणार का शिस्तभंग?अमरावती : ऐन निवडणुकीच्या काळात बदल्यांचे आदेश काढत महापालिका आयुक्तांनी निवडक कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय दंडुका उगारण्याचे धाडस दाखविले आहे. वसुली आणि अन्य विभागातील साखळी तोडण्यासाठी हा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. तथापि बदली आदेशाला न जुमानता बदलीच्या ठिकाणी न जाण्याचा शिरस्ता बहुतांश कर्मचाऱ्यांनी कायम ठेवल्याने आयुक्त हेमंत पवार ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर नेमकी कुठली कारवाई करतात, याकडे संपूर्ण महापालिका वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता केराची टोपली दाखविण्याच्या परंपरेला छेद देण्याची, तद्वतच पालिकेतील भ्रष्ट साखळीला ‘ब्रेक’ लावण्याचे आव्हान आयुक्तांसमोर उभे ठाकले आहे.महापालिका वयाच्या पंचविशीत येत असताना तिला टक्केवारीचे ग्रहण लागले आहे. महापालिकेतील बहुतांश फाईल्सवर ‘वजन’ ठेवल्याशिवाय त्या पुढेच सरकत नसल्याचे उघड वास्तव आहे. अनेक कंत्राटदार स्वत:च कामाच्या फाईल्स घेऊन महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी घेऊन देयके काढून घेत असतात. महापालिकेच्या अनेक महत्त्वाच्या फाईल्स खासगी व्यक्ती हाताळतात. ही बाब महापालिकेसाठी नवीन नाही. साफसफाईच्या देयकावर ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांच्या बनावट स्वाक्षरीचे प्रकरण अगदी ताजे आहे. महापालिकेतील बहुतांश विभागात टक्केवारीची बजबजबपुरी माजली असताना बदली प्रक्रियेत सुद्धा प्रचंड अर्थकारण शिरल्याची साधार भीती व्यक्त केली जात आहे. आयुक्त २२ कर्मचाऱ्यांची बदली करतात काय आणि त्यातील एखाद दुसरा अपवाद वगळता उर्वरित कर्मचारी ते बदली आदेश झुगारुन टाकतात काय, हा प्रकार प्रशासकीय हडेलहप्पीपणाचे द्योतक ठरले आहे. प्रसंगी प्रशासकीय प्रमुख असलेल्या आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देऊन खुर्ची न सोडण्याची मानसिकता त्यातून प्रतिबिंबित होते.बदली आदेश आणि कारणे दाखवा नोटीस बजावूनही बदली झालेल्या ठिकाणी अनेक कर्मचारी रूजू होत नाहीत.त्या ‘चिपकुं’ची यादी तयार महापालिकेत वर्षोनुवर्षे एकाच खुर्चीला चिटकून राहणाऱ्यांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यापार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी राहून आर्थिक साखळी ‘बळकट’ करणाऱ्यांचा खांदेपालट करण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर ही बदली प्रक्रिया राबविली जाईल.९ फेब्रुवारीला आयुक्तांनी काढलेले बदली आदेश मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अपेक्षित असलेल्या बदलीआदेशांची रंगीत तालीम ठरले आहेत.यांचा असेल समावेश !पाच ते तब्बल २७ वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणाऱ्यांमध्ये लेखा विभागातील २, जीएडीतील ३, बांधकाम विभागातील १ ,अतिक्रमण विभाग,आरोग्य आणि उद्यान विभागातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचा समावेश असण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. राजकीय दबावतंत्राला जुमानता ही बदली प्रक्रिया राबविली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले. २२ जणांच्या बदलीप्रक्रियेनंतर झालेली ओरड पाहता आयुक्त, उपायुक्त आणि महापौरांकडील कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासनाच्या विचाराधीन आहेत.