शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

१२ दिवसांत चार लाख क्विंटल तूर खरेदीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:57 IST

जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रांना १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली तरी दहा दिवसांत १२ पैकी चार केंदे्रच सुरू झालेली आहेत. अद्याप आठ केंद्र बंद आहेत.

ठळक मुद्दे४२ हजार शेतकरी प्रतीक्षेत : मुदतवाढीनंतरही चार केंद्रेच सुरू, आठ बंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रांना १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली तरी दहा दिवसांत १२ पैकी चार केंदे्रच सुरू झालेली आहेत. अद्याप आठ केंद्र बंद आहेत. तूर खरेदीच्या नावावर खरेदीदार यंत्रणांंद्वारा टाइमपास सुरू असल्याने उर्वरित १२ दिवसांत टोकन दिलेल्या ४२ हजार ४०२ शेतकऱ्यांची किमान चार लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचे आव्हान आहेफेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून १२ तूर खरेदी केंद्रांवर १८ एप्रिलपर्यंतच आॅनलाइन नोंदणीचे पणन विभागाचे आदेश होते. त्यानुसार आतापर्यंत ७० हजार १९७ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केलीे. २७ हजार ७९५ शेतकºयांची ४.३७ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. आता केंद्रांना १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी अमरावती, चांदूरबाजार, दर्यापूर व तिवसा केंद्रांवरच खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. उर्वरित १२ दिवसांत ४२,४०२ शेतकºयांकडून तूर खरेदी आवश्यक आहे. मात्र, पणनसह व्हीसीएमएफद्वारा तूर खरेदीच्या नावावर टाइमपास करण्यात येत आहे. शासनाने घोषणा करायची, शेतकºयांना दिलासा द्यायचा अन् खरेदीदार यंत्रणाद्वारा शेतकºयांची वाट लावायची; हाच गोरखधंदा यंदाच्या हंगामात सुरू आहे. मागील वर्षी याच यंत्रणाद्वारा दिवसाला १५ हजार क्विंटलपर्य$ंत तूर खरेदी करण्यात आली. यंदा मात्र गोदाम, ग्रेडर आदी कारणे दाखवून दिवसाला दोन हजार क्विंटलपर्यंतच तूर खरेदी करण्यात येत आहे. शासनाने मुदतवाढ दिली असताना पणन विभागाचे नियंत्रण नसल्यामुळे शेतकºयांचा चार लाख क्विंटलपेक्षा अधिक शेतमाल घरी पडून आहे. व बाजार समित्यांचे नियंत्रण नसल्यामुळे व्यापारी हमीपेक्षा कमी भावाने शेतमालाची खरेदी करीत असल्याचे वास्तव आहे.केंद्रनिहाय नोंदणीसध्या अचलपूर केंद्रावर ८,८६३, अमरावती ८,६१३, अंजनगाव सुर्जी ४,७०९, चांदूरबाजार ६,११२, चांदूर रेल्वे ४,७४३, दर्यापूर ७,२२६, धारणी ९३५, नांदगाव ४,७३४, तिवसा २,७८६, मोर्शी ७,४१५, धामणगाव ६,४६४ व वरूडमध्ये ७,५०७ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली.केंद्रनिहाय खरेदीअचलपूर केंद्रावर ३८,२८९, अमरावती ६०,७६७, अंजनगाव सुर्जी २६,३४९, चांदूर रेल्वे ३५,६८८, चांदूरबाजार ३३,५४६, दर्यापूर ७०६०७, धारणी ७,०१२, नांदगाव खंडेश्वर २१,८०४, धामणगाव २८,८४१, तिवसा २४,८२५, मोर्शी ५२,०६१ व वरुड ३७,८०३ क्विंटल तूर खरेदी झाली आहे.आयटीसीचे गोदाम उपलब्ध झाले आहे. मंगळवारी कामगार दिनामुळे केंद्र बंद होती बुधवारपासून सर्व केंद्रावर खरेदी सुरू करण्यात आलेली आहे.- रमेश पाटीलजिल्हा विपणन अधिकारी