शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

जीवनशैली निर्देशांकातील मानांकन टिकविण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 22:38 IST

केंद्र शासनाने देशात ११६ व राज्यात १२ शहरातील नागरिकांच्या जीवनशैलीच्या अनुषंगाने शहरी राहणीमान निर्देशांक कार्यक्रम राबविला. यामध्ये पुणे, मुंबईच्या पाठोपाठ अमरावतीचा पाचवा क्रमांक आला. ही बाब अमरावतीकर म्हणून गौरवाची असली तरी हा क्रमांक टिकवून ठेवणे, किंबहुना यापेक्षा अधिक पुढे जाणे हे आव्हान समोर आहे. दरवर्षी असणारा हा उपक्रम पुन्हा एप्रिलपासून सुरू होणार आहे.

ठळक मुद्देशहर राज्यात पाचवे, देशात सोळावे : केंद्र शासनाच्या गृहनिर्माण मंत्रालयाचा उपक्रम, यंदा एप्रिलपासून सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाने देशात ११६ व राज्यात १२ शहरातील नागरिकांच्या जीवनशैलीच्या अनुषंगाने शहरी राहणीमान निर्देशांक कार्यक्रम राबविला. यामध्ये पुणे, मुंबईच्या पाठोपाठ अमरावतीचा पाचवा क्रमांक आला. ही बाब अमरावतीकर म्हणून गौरवाची असली तरी हा क्रमांक टिकवून ठेवणे, किंबहुना यापेक्षा अधिक पुढे जाणे हे आव्हान समोर आहे. दरवर्षी असणारा हा उपक्रम पुन्हा एप्रिलपासून सुरू होणार आहे.केंद्रीय शहरी गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाच्यावतीने मागील वर्षी राज्यासह देशातील शहरी राहणीमानविषयक माहिती जाणून घेण्यात आली. यामध्ये एकूण ७९ निर्देशांकाच्या अनुषंगाने ही माहिती विहिद कालावधीत पूर्ण करण्याचे कसब या उपक्रमाच्या शहर समन्वयक डॉ. श्वेता बोके यांनी दाखविल्याने अमरावतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. केंद्रीय मंत्रालयाच्यावतीने राज्यातील मार्केट रिसर्चकरिता ‘इन्फॉस’ या संस्थेची निवड करण्यात आली. या उपक्रमांतर्गत शहरी राहणीमानाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक बाबीचे बारकार्ईने निरीक्षण व परीक्षण करण्यात आले. प्रत्येक बाबीचे अ‍ॅपद्वारे आॅडिट व जिओ टॅगिंग करण्यात आले. राज्यातील १२ व देशातील ११६ शहरामधील नागरिकांच्या राहणीमानाशी त्याची गुणात्मक तुलना करण्यात आली. यामध्ये अमरावती शहराला हे गुणात्मक मानांकन मिळाले आहे.जीवनशैली निर्देशांकात इंस्टिट्यूशनल, सोशल, इकॉनॉमी व फिजीकल हे प्रामुख्याने चार निर्देशांक होते. यामध्ये जवळपास ७९ उपनिर्देशांकावर आधारित गुणात्मक मानांकन करण्यात आले. यामध्ये इंस्टिट्यूशनलला २५ गुण, सोशलला २५, इकॉनॉमीला ५, तर फिजीकल ४५ असे १०० गुण होते. यामध्ये अमरावतीने ४६.५७ गुण मिळवून राज्यात पाचवे व देशात १६ वे स्थान मिळविले. सन २०१९-२०२० करिता पुन्हा एप्रिलपासून हा उपक्रम सुरू होणार आहे. यासाठी नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. महापालिका आयुक्तांची भूमिका सकारात्मक असल्यामुळे यावर्षीदेखील अमरावती ही पहिल्या पाच शहरामध्ये मानांकन मिळेल, असा विश्वास डॉ. श्वेता बोके यांनी व्यक्त केला. या सर्वेक्षणाचा अहवाल पुस्तिकेच्या स्वरूपात केंद्र शासनाला सादर झालेला असल्याने प्रत्येक शहराकडून आलेल्या अहवालावरून कोणत्या शहरासाठी कशाचे नियोजन हवे, याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे आणि त्यानुसार केंद्र शासनाकडून त्याप्रमाणे निधी व योजना देण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.या मापदंडावर जीवनशैैली निर्देशांकाची निश्चितीकेंद्र शासनाच्या गृहनिर्माण व जीवनशैली मंत्रालयाद्वारे आयोजित जीवनशैली निर्देशांकात अमरावती शहराची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सुरक्षितता, अर्थव्यवस्था, रोजगाराच्या संधी, सार्वजनिक मैदाने, जमिनींचा वापर, ऊर्जा व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण स्थान, स्थिरता, आरोग्य सेवा, पर्यावरण, वीज कंपनी, सिंचन, परिवहन, राज्य विक्रीकर, बांधकाम, हॉटेल आणि इतर पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण करून मापदंडानुसार जीवनशैली निर्देशांक मिळाला. आता मात्र हे मानांकन टिकविण्याचे आव्हान अमरावतीकरांसमोर आहे.पंधरा मुद्द्यांवर झाली शहराची पाहणीशहरातील नागरिकांच्या जीवनशैलीशी निगडित महापालिकेने पुरविलेल्या सुविधादेखील या उपक्रमात थर्ड पार्टी आॅडिटद्वारा अभ्यासण्यात आल्यात. यामध्ये स्थापत्य, विद्युत, आरोग्य, वैद्यकीय, बांधकाम, मिळकत कर, पाणीपुरवठा, नागरी वस्ती, या सर्व विभागांसह रेल्वे, एसटी, पीएमपीएल, महावितरण, आरटीओ व शैक्षणिक संस्था अशा एकूण १८ विभागांतील माहिती एकत्रित करण्यात आली. यासाठी नियुक्त कोअर कमिटीद्वारे महत्त्वाच्या व कमी महत्त्वाच्या अशा एकूण १५ मुद्द्यांवर शहराची पाहणी करण्यात आली. यामध्ये राज्यातील १२ शहराच्या तुलनेत अमरावतीने बाजी मारली.असे राहीले अमरावतीचे मानांकनया जीवनशैली निर्देशांकात अमरावतीतील ४६.५७ गुण मिळून राज्यात पाचवे स्थान मिळाले. यामध्ये ५८.११ गुणांसह पुणे प्रथम, ५८.०२ गुणांसह नवी मुंबई द्वितीय, ५७.७८ गुणांसह ग्रेटर मुंबई तृतीय व ५२.१७ गुणांसह ठाणे चवथ्या क्रमांकावर आहे. देशपातळीवरील रँकिंगमध्ये अमरावती १६ व्या, नाशिक ४४.५७ गुणांसह २१ व्या, तर ४०.०१ गुणांसह नागपूर शहर ३१ व्या स्थानावर आहे.