शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या पंधरवड्यात हद्द निश्चितीचे आव्हान

By admin | Updated: August 23, 2016 23:58 IST

सन २०१७ च्या पूर्वार्धात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचनेचे वेळापत्रक निश्चित झाले आहे.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक : वेळापत्रक जाहीर अमरावती : सन २०१७ च्या पूर्वार्धात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचनेचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. यानुसार १५ दिवसांत नव्या स्वरूपात प्रभागांची हद्द निश्चित करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. बहुतेकवेळा प्रारूप प्रभाग स्वत:च अंतिम होत असल्याने सप्टेंबरमध्येच बहुसदस्यीय प्रभागांची हद्द इच्छुकांना समजू शकणार आहे. राज्यातील नऊ महापालिकांची मुदत मार्च-एप्रिल २०१७ मध्ये संपत असल्याने पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निवडणुकांसाठी प्रभागरचनेचा कार्यक्रम आयोगाने शनिवारी जाहीर केला. त्यानुसार सात सप्टेंबरपर्यंत महापालिकेला प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव निश्चित करायचा आहे. त्यातही अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींकरिता आरक्षित प्रभागांसह हा प्रस्ताव तयार करण्यासाठी पालिकेकडे केवळ १५ दिवस आहेत. संभाव्य प्रभागाच्या रचनेचा प्रस्ताव बनविण्यासाठी पालिका यंत्रणेची कसरत होणार आहे. ठरावीक कालमर्यादेत हे काम पूर्ण करायचे असल्याने अतिरिक्त मनुष्यबळाची मदतही घेण्यात येणार आहे. मनपासाठी सन २०११ लोकसंख्येच्या आधारे सदस्यसंख्या निश्चित केली जाईल. त्यानंतर बहुसदस्यीय पद्धतीने प्रभागरचना होईल. तूर्तास महापालिकेचे सभागृह ८७ सदस्यांचे आहे. त्यामुळे २१ प्रभाग चार सदस्यीय व १ प्रभाग ३ सदस्यांचा राहू शकतो. ही प्रक्रिया नोव्हेंबर अखेरपर्यंत चालणार असून आचारसंहिता डिसेंबर-जानेवारीमध्ये लागणार असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी अवघा महिनाच मिळेल, असे संकेत आहेत. प्रभागरचना, आरक्षण सोडतीचे वेळापत्रक प्रारुप प्रभागरचनेचा प्रस्ताव तयार करणे -७ सप्टेंबर, प्रारुप प्रभागरचनेचा प्रस्ताव (एससीएसटी, आरक्षित प्रभागासह तपासणी करुन निवडणूक आयोगाकडे १२ सप्टेंबरपर्यंत पाठविणे, सोडतीसाठी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांकरिता), जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे- ४ आॅक्टोबर, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिलांसाठी सोडत-७ आॅक्टोबर, प्रारुप प्रभागरचनेची (सोडतीनंतर) अधिसूचना १० आॅक्टोबर, हरकती व सूचना १० ते २५ आॅक्टोबर, यावर प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी ४ नोव्हेंबर, सुनावणी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी शिफारशी नमुद करुन प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे सादर करणे, १० नोव्हेंबर, हरकती व सूचनांचा विचार करुन निर्णय देणे- २२ नोव्हेंबरपर्यंत, अंतिम अधिसूचना २५ नोव्हेंबर.