लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यातील शहापूर येथील कृत्रिम पाणीटंचाईच्या मुद्द्यावर येथील राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे गुरुवारी तब्बल दीड तास रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली.तालुक्यात एच.जी. इंफ्रा कंपनीकडून महामार्गाचे काम सुरू आहे. या कंपनीने जरूड ते शहापूर मार्गावरील जमिनीतील पाइप लाइन फोडली. त्यामुळे शहापूरवासीयांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्याअनुषंगाने पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आठवड्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र मुदतीनंतरही पाइप लाइनची दुरुस्ती करण्यात न आल्याने शहापूर बस स्टँडवर चक्काजाम करण्यात आलातहसीलदार सुनील सावंत यांच्या लेखी आश्वासनानंतर ठाणेदार मगन मेहते यांच्या मध्यस्थीने शहापूरवासीयांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, बाबाराव बहुरूपी, तुषार निकम, नगरसेवक धनंजय बोकडे, गोपाल सोरगे, मनोज इंगोले, शहापूरच्या सरपंच शारदा पाटील, ग्रामपंचायत सदस्य शकील शाह, शहापूर युवक काँग्रेस अध्यक्ष दुर्गेश धुर्वे, शहनाझ शाह, योगिता युवनाते, मकसूद पठाण, मनोज गेडाम, अमोल डबरासे, अल्का ढोले, बंटी काझी, वैभव पोतदार, अजय धुर्वे, खालीक सौदागर, हेमंत बारस्कर, अतुल वाघमारे, मंगेश ताडाम, पंकज कुमरे, नीलेश कुकडे, रशीदभाई सहभागी झाले होते.
राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:01 IST
लोकमत न्यूज नेटवर्क वरूड : तालुक्यातील शहापूर येथील कृत्रिम पाणीटंचाईच्या मुद्द्यावर येथील राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे ...
राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम
ठळक मुद्देशहापुरात पाणीप्रश्न पेटला : पाईप लाईन दुरुस्तीअभावी कृत्रिम टंचाई