शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘चकर, मकर क्या देखो, फगवा दे मेको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 22:12 IST

‘बेचो तुम्हारी जोरू का लहंगा, देओ हमारा फगवा देओ, धोटा (मर्द) हो ठहरो रे, जपाय (औरत) हो तो भागो रे, होली का डांडा जली गयो रे, देओ हमारा भगवा देओ’’ हे सूर आता मेळघाटातील गावागावांत ऐकावयास मिळू लागले आहे.

ठळक मुद्देमेळघाटात फगव्याची धूमशान : पाच दिवस मानवी नाके

आॅनलाईन लोकमतचिखलदरा/धारणी : ‘बेचो तुम्हारी जोरू का लहंगा, देओ हमारा फगवा देओ, धोटा (मर्द) हो ठहरो रे, जपाय (औरत) हो तो भागो रे, होली का डांडा जली गयो रे, देओ हमारा भगवा देओ’’ हे सूर आता मेळघाटातील गावागावांत ऐकावयास मिळू लागले आहे. ‘चकर, मकर क्या देखो, फगवा दे मेको’ अशी फगवा गीते गात आदिवासी युवक-युवती रस्त्यावर उतरले असून, शनिवारपासून बुधवारपर्यंत हा कार्यक्रम मेळघाटात चालणार आहे.मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या सर्वात मोठे होळी सणाला शनिवारपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. आपापल्या गावातील होळी जाळल्यानंतर आता महिलांची टोळी दुसऱ्या गावात फगवा मागण्यासाठी निघाल्या आहेत. ज्यांच्याशी त्यांची ओळख असते, अशा लोकांकडून हक्काने फगवा मागणे सुरू आहे. बळजबरी न करता, जे मिळेल ते स्वीकारीत घराघरांतून फगवा वसुली करण्यात येत आहे. पंधरा दिवस कुठल्याच कामावर न जाता होळीचा आनंद आदिवासी घेणार आहेत.परतवाड्यात होळी पूजनपरतवाडा : जुळ्या शहरांत स्थानिक आदिवासी समाजबांधवांचा होळी पूजन महोत्सव श्रीक्षेत्र वाघामाता मैदानात पार पडला. १० वर्षांपासून आदिवासी समाज संघटना व आदिवासी होळी समिती यांच्यावतीने हा आयोजित केला जातो. अध्यक्षस्थानी दादुजी धुर्वे होते. यावेळी माजी आमदार केवलराम काळे, जि.प. सदस्य दयाराम काळे, सभापति कविता काळे, सुभाष जांभेकर, तुुकाराम काळे, रूपलाल बेठेकर, समिती अध्यक्ष काकडे, महादेवराव कासदेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.जांगडी को देखो तो...मेळघाटच्या घाटवळणातील नागमोडी रस्त्यावर युवक-युवतींचे मानवी नाके पाच दिवस दिसणार आहे. जांगडी (शहरी माणूस) ची वाहने रस्त्यावर लावलेल्या दगड, लाकडाने अडवून फगवा वसूल केला जात आहे. पाच दिवस फगवा वसूल झाला की, त्यातून जुलू (मटण), सिड्डू (दारू) आणि चावली (भात) पुरीचे जेवणाची पंगत गावशिवारावर उठणार आहे. एकंदर मेळघाटातील आदिवासींच्या विश्वात आनंदाचे वातावरण आहे. वर्षभर जमा करून ठेवलेली पुंजी मनसोक्त होळीच्या रंगात उधळत असल्याचे चित्र आहे.ढोल-बासरीचा मधुर नादहोळी पूजन महोत्सवात आदिवासी कोरकू समाजाचे सांस्कृतिक ढोल-बाँसुरी पथक होते. लोकनेता, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आबालवृद्धांनी या वाद्यांच्या तालावर पारंपरिक गादली-सुसुन नृत्य केले.