शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीविना विधी समितीचा कारभार

By admin | Updated: August 3, 2015 00:16 IST

महापालिकेच्या विधी समिती सभापती शमीम बानो सादीक आयडीया यांनी निवडणुकीच्या काळात प्रतिज्ञापत्र ...

कोर्टात याचिका : तीन अपत्यप्रकरणी निलंबनाची कारवाईअमरावती : महापालिकेच्या विधी समिती सभापती शमीम बानो सादीक आयडीया यांनी निवडणुकीच्या काळात प्रतिज्ञापत्र सादर करताना तीन अपत्यप्रकरणी खोटी माहिती सादर केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना अद्यापपर्यंत विधी समिती सभापतीपदी कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. परिणामी सभापतीविना विधी समितीचा कारभार, असे चित्र आहे.चांदनी चौक प्रभागाच्या नगरसेविका शमीमबानो सादीक आयाडीया यांनी अपत्याची खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी येथील इन्कलाब संघटनेचे अध्यक्ष वाहीद खान यांनी तक्रार दिली होती. दरम्यान हे प्रकरण विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जिल्हा सत्र न्यायालय असा प्रवास करीत पुन्हा महापालिका आयुक्तांकडे आले. शमीमबानो यांची विधी समिती सभापतीपदी एप्रिल महिन्यात निवड करण्यात आली. दरम्यान त्यांनी अपत्याची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण न्यायालय स्तरावर सुरु होते. परंतु शमीमबानो यांची विधी समिती सभापतीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी मे महिन्यात पदग्रहण स्वीकारले होते. याचवेळी त्यांचे हे प्रकरण आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यासमोर येताच त्यांनी शमीमबानो यांचे सदस्यपद खारीज केले.त्यामुळे शमीमबानो यांना विधी समिती सभापतिपदावरुनही मूक्त व्हावे लागले. आदल्या दिवशी पदग्रहण तर दुसऱ्या दिवशी पदमुक्त असा विचित्र योग शमीमबानो सादीक आयडीया यांच्या वाट्याला आला होता. मात्र आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सदस्यपद निलंबित करण्याचा घेतलेल्या निर्णयाविरुद्ध शमीेमबानो यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. परंतु शमीमबानो यांच्या याचिकेवर अजूनही निकाल लागला नाही. परंतु महापालिका प्रशासनाने विधी समितीचे कामकाज ठप्प पडू नये, यासाठी उपसभापती सुनीता भेले यांच्या माध्यमातून विधी समितीचा कारभार चालविला आहे. उच्च न्यायालयाच्या निकालावरच पुढील निर्णय घेता येईल, असे नगरसचिव मदन तांबेकर म्हणाले. जून, जुलै या दोन महिन्यांचे विधी समितीचे कामकाज सुरु असून नव्याने सभापतीपदी नियुक्तीची प्रक्रिया न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)थेट तक्रारीवर कारवाई झाली आहे. विधी समिती सभापती शमीमबानो सादीक आयडीया यांना बाजू मांडण्याची संधी आयुक्तांनी देणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. न्यायालयात हा विषय प्रलंबित आहे. प्रशासनाकडून सभापतीपदाबाबत काही आल्यास पुढील निर्णय घेता येईल.- अविनाश मार्डीकर, गटनेता, राष्ट्रवादी फ्रंट.शमीमबानो सादीक आयडीया यांचे सदस्यत्व निलंबनाची कारवाई ही आयुक्तांचा निर्णय आहे. हल्ली हे प्रकरण न्यायालयात असून त्याविषयी काही बोलणे संयुक्तिक नाही. प्रभागातील विकासकामांची जबाबदारी ही प्रशासनाची आहे.- मदन तांबेकर, नगरसचिव, महापालिका.