शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘चाणक्य, किशन’वर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 22:46 IST

पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शनिवारच्या नाईट राऊन्डदरम्यान नांदगाव पेठ हद्दीतील हॉटेल चाणक्य व किशन ढाब्याची झडती घेतली.

ठळक मुद्देमालकासह दहा जणांविरुद्ध गुन्हा : पोलीस आयुक्तांचा नाईट राऊन्ड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शनिवारच्या नाईट राऊन्डदरम्यान नांदगाव पेठ हद्दीतील हॉटेल चाणक्य व किशन ढाब्याची झडती घेतली. दरम्यान पोलिसांना त्या ठिकाणी दारू पिताना काही नागरिक आढळून आले. पोलिसांनी हॉटेल चाणक्यचे मालक नितीन हिवसेंसह चार जण व किशन ढाब्यावरील पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदविले.पोलीस आयुक्तांच्या नाईड गस्तीमुळे अवैध दारू विक्री करणारे व मद्यपींचे धाबे दणाणले आहेत. सीपींनी सलग आठ दिवस शहरातील विविध परिसरात नाईट राऊन्ड घेऊन अवैध दारू व्यावसायिक, गुन्हेगार व मद्यपींवर लक्ष केंद्रित केले. अनेकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत झाली. शनिवारी सीपींनी शहरातील नांदगाव पेठ हद्दीत अचानक नाईट राऊन्ड घेतला. त्यामध्ये हॉटेल गौरी ईनसह चाणक्य व किशन ढाब्याची झडती घेतली. त्यावेळी हॉटेल चाणक्यमध्ये देवेंद्र भाऊराव गोरडे, विजय वासुदेव खेरडे, गोपाल नामदेव जावरकर (सर्व राहणार हिवरखेड) व चेनत अशोक कराळे (रा.अर्जुननगर) हे इसम दारू पिताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याजवळील दारू जप्त करून हॉटेल मालक नितीन केशवराव हिवसेंचा शोध घेतला असता ते तेथून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच सीपींनी पुढे मोर्चा वळवीत नांदगाव पेठ महामार्गावरील हॉटेल किशन ढाब्यावर धाड टाकली. दरम्यान त्याठिकाणी अक्षय रमेश तांगडे, मारोती भीमराव ससाने, रमेश रामराव तांगडे, राजू शामसुंदर पंडित हे इसम दारू विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याजवळील दारु जप्त करून राजु हरिभाऊ चाटेचा शोध घेतला असता ते पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली, तर दोन घटनास्थळावरून पसार झाले आहे.