शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र प्रदान समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 23:22 IST

विदर्भातील अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणातील नामांकित अग्रगण्य संस्था शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती या संस्थेचा संस्था पातळीवरील सातवा (आठव्या तुकडीचा) पदवी प्रमाणपत्रे प्रदान समारंभ ...

ठळक मुद्देपदविका कार्यक्रम : सात विद्यार्थ्यांनी पटकाविले सुवर्ण पदक , सक्षम अभियंता होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भातील अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणातील नामांकित अग्रगण्य संस्था शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती या संस्थेचा संस्था पातळीवरील सातवा (आठव्या तुकडीचा) पदवी प्रमाणपत्रे प्रदान समारंभ रविवारी संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृह उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सात विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली आहे.पदवी प्रमाणपत्र समारंभासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू एम.जी. चांदेकर, अ.भा. तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीचे उपाध्यक्ष एम.पी.पुनिया, महाविद्यालय व्यवस्थापन मंडळाचे सदस्य मोहम्मद झुहेर, कुणाल टिकले, प्राचार्य आर.एस.दाळू, शैक्षणिक अधिष्ठाता अनंत धात्रक, परीक्षा नियंत्रक क्षितिजा कदम, विविध विद्या शाखांचे विभागप्रमुख, अधिष्ठाता व इतर निमंत्रित सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. प्राचार्य आर.एस. दाळू यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा वार्षिक अहवाल सादर केला.यावेळी विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ४५२ बी. टेक व ११५ एम. टेक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे व गुणपत्रे प्रदान करण्यात आली.कुलगुरू एम.जी.चांदेकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी बहुमूल्य मार्गदर्शन केले. आजच्या युगातील झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान आत्मसात करून स्वत: सदोदित सिद्ध ठेवण्याचे व अखंडित ज्ञानार्जन करून बदलणाºया भारताच्या विकासपर्वात सक्षम अभियंता व सुजाण नागरिक म्हणून सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कर्तव्यनिष्ठेसोबत कदापिही तडजोड करू नका. सामाजिक जबाबदारीसोबतच स्वत:ला सक्षम अभियंता बनून जग पादाक्रांत करा व स्वत:ला सिद्ध करा, असा मंत्र विद्यार्थ्यांना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्लीचे उपाध्यक्ष एम.पी. पुनिया यांनी त्यांच्या संबोधनात दिला. सुवर्ण पदक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांसह सर्वांचे कौतुक केले. आपल्यातील क्षमतांचा विस्तार करून आकाशाला गवसणी घालण्याचे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले. अभ्यासक्रमांना जागतिक गरजांसाठी सदोदित अद्ययावत व सुसंगत ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली व यासाठी अखिल भारतीय तंत्र परिषदेकडून सर्वतोपरी मदत संस्थेला करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राष्टÑगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. शैक्षणिक अधिष्ठाता अनंत धात्रक व सुभदा ठाकरे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.