शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंचा ‘टाईम बाऊंड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:30 IST

जिल्हा परिषदेत फायलींचा निर्धारित वेळेत निपटारा करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी वेळापत्रक ठरवून दिले आहे. फायलींवर एकाच प्रवासात निर्णय घेऊन कामांना गती द्या, अशा सूचना त्यांनी सर्व विभागांना दिल्या. प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याची जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून, विलंब लावणाऱ्यांवर दप्तरदिरंगाई कायद्यांतर्गत कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : संचिकांचा निपटारा वेळेत करा

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत फायलींचा निर्धारित वेळेत निपटारा करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी वेळापत्रक ठरवून दिले आहे. फायलींवर एकाच प्रवासात निर्णय घेऊन कामांना गती द्या, अशा सूचना त्यांनी सर्व विभागांना दिल्या. प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याची जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून, विलंब लावणाऱ्यांवर दप्तरदिरंगाई कायद्यांतर्गत कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला.फायलींचा निपटारा करण्यासाठी कालमर्यादा असावी व अनावश्यक फेऱ्या थांबाव्यात, यासाठी अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी आग्रही आहेत. सर्वसाधारण स्थायी सभांतून अनेकदा मागणीही करण्यात आली. संचिकेस विलंब होत असल्याचे काही महिन्यांपूर्वी पदभार घेतलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी फाइल कोणत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी किती दिवस असावी आणि किती दिवसांत तिचा निपटारा करावा, याचे सूक्ष्म नियोजन केले आहे. याचा कालबद्ध आराखडा तयार करून सर्व विभागप्रमुखांना नोटीसद्वारे कळविणार आहे. कायदा शासन निर्णय व नियमांचा संदर्भ देत संचिका पुढे पाठवाव्या, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. विलंब करणाºयांवर दिरंगाईची कारवाई केली जाणार आहे.आठवड्यात निर्णयसंचिकेवर कनिष्ठ सहायकांनी दोन दिवसांत निर्णय घ्यावा. वरिष्ठ सहायकांनी दोन दिवस, कनिष्ठ किंवा सहायक प्रशासन अधिकाºयांनी एक दिवस, वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांनी एक दिवस आणि खातेप्रमुखांनी दोन दिवसांत फाइल पुढे पाठवावे. सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागालाही हा निर्णय लागू असून, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दोन दिवसांत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.नागरिकांची सनद हवीनव्याने रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी सकारात्मक असल्याने कामाला गती मिळाली आहे. त्यांना सर्व पदाधिकारी व सदस्यांचे नेहमी सहकार्य राहील. संचिका वेळेत निकाली काढण्यासाठी कालमर्यादा घालून देण्याचा निर्णय स्तुत्य आहे. आता प्रत्येक विभागात नागरिकांची सनदही लावण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे.फायलींचा निर्धारित वेळेत निपटारा करण्याच्या उद्देशाने विहित मुदतीत आवश्यक कारवाई करावी. कारण नसताना त्या पेंडिंग ठेवू नये. दप्तरदिरंगाई केल्यास सदर कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.- मनीषा खत्रीसीईओ, जिल्हा परिषद