शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात ५५१ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तींचे अधिकार सीईओंना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 11:14 IST

अमरावती जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ५५१ ग्रामपंचायतींवर योग्य व्यक्तीची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या सीईओंना देण्यात आले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या सल्ल्याने योग्य व्यक्तींची करणार निवडग्रामविकास विभागाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ५५१ ग्रामपंचायतींवर योग्य व्यक्तीची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या सीईओंना देण्यात आले आहे. तसे आदेश सोमवारी ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी काढले आहेत. पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने योग्य व्यक्तींची नियुक्ती सीईओ करणार असल्याने सध्या आठ ते दहा ग्रामपंचायतींचे प्रशासक असणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासक पदावर आता गंडांतर आले आहे.जिल्ह्यात एप्रिल ते जून दरम्यान ५२४ ग्रामपंचायती निवडणुकीस पात्र आहेत. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारी अर्जाची छाननीपर्यंत निवडणूक प्रक्रिया असताना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आहे त्या स्टेजवर निवडणूक पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली. या सर्व ग्रामपंचायतींवर पंचायत समितींच्या विस्तार अधिकारी दर्जाचे अधिकाऱ्यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

एका विस्तार अधिकाऱ्यांकडे ८ ते १० ग्रामपंचायतींचा कारभार आला असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. याच दरम्यान गत आठवड्यात अध्यादेश जारी होऊन या ग्रामपंचायतींंमध्ये विस्तार अधिकाऱ्यांऐवजी योग्य व्यक्तीची प्रशासकपदी निवड करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.जुलै ते डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील २७ ग्रामपंचायती निवडणुकीस पात्र आहेत. सोमवारच्या आदेशान्वये आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासकांची नियुक्ती करणार आहेत. ग्रामविकास विभागाच्या या आदेशान्वये इच्छुकांची लगबग वाढली आहे.सीईओंच्या आदेशाविरुद्ध करता येणार अपीलमुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची निवड करण्यात आलेली असताना अशा व्यक्तींकडून कर्तव्ये पार पाडताना झालेल्या दुर्लक्षाबाबत किंवा गैरवर्तणुकीबाबत त्या व्यक्तीला पदावरून दूर करण्याचे अधिकार सीईओंनाच आहेत. सीईओंचे आदेश निर्गमित झाल्याचे १५ दिवसांचे आत प्रशासकाला शासनाकडे अपील करता येणार आहे. या नियुक्तीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवल्यास अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामविकास विभागाला राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Governmentसरकारgram panchayatग्राम पंचायत